शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

आधुनिक, प्रगत व सक्षम महाराष्ट्र घडवू या!

By admin | Updated: May 2, 2017 05:17 IST

राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच आधुनिक, प्रगत व सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मला

मुंबई : राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच आधुनिक, प्रगत व सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मला नागरिकांकडूनही मन:पूर्वक सहकार्याची अपेक्षा आहे. सर्वांच्या एकत्रित सहभागातून आपले राज्य विकसित आणि समृद्ध बनवू या, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी महाराष्ट्र दिनानिमित्त येथील शिवाजी पार्क येथे आयोजित राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभप्रसंगी केले.राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लेखाजोखा या वेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी मांडला. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अडीच लाखांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. शाश्वत शेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ‘स्वच्छ भारत’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा एक भाग म्हणून राज्यातील २२५ शहरे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर, २ आॅक्टोबर २०१७पर्यंत महाराष्ट्राच्या नागरी भागाला हागणदारीमुक्त करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा हमी कायद्याअंतर्गत जवळपास ३७२ सेवा पुरविण्यात आल्या आहेत. राज्याच्या ५१ शहरांमध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची सरकार अंमलबजावणी करणार आहे. (प्रतिनिधी)मुंबई विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणांमुळेच म्हाडाला बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगतले. २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. महाराष्ट्र हा उत्कृष्ट वनस्पतीसमूह आणि प्राणिजात यांनी संपन्न असा प्रदेश आहे. नवीन पर्यटन धोरणामुळे या पर्यटन क्षेत्रातील वाढीची नवीन दालने खुली होतील, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह सेना दल, पोलीस दल, राज्य शासनाचे विविध विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य राखीव पोलीस दल, मुंबई पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस दल, निशाण टोळी, लोहमार्ग पोलीस दल, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस दल, राज्य परिवहन विभाग, अग्निशमन दल, महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, ब्रास बॅण्ड पथक, पाइप बॅण्ड पथक, मोटारसायकल वाहतूक पोलीस पथक यांनी या वेळी संचलन केले. मोटार परिवहन विभागाच्या रक्षक बुलेटप्रूफ व्हॅन, मार्क्समन बुलेटप्रूफ व्हॅन, महिला सुरक्षा पथक, महारक्षक बुलेटप्रूफ व्हॅन, वरुण वॉटर कॅनन यांचे तसेच अग्निशमन दलाच्या फायर इंजिन व हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचेही प्रदर्शन या वेळी करण्यात आले.