शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांकडे जाऊ या!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 11:42 IST

म.सा.प.च्या कार्याध्यक्षांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

वर्धा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. वर्धा येथे ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्राचा प्रारंभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी वर्ध्यात आले होते. यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोकचळवळ उभी केली. पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्रे पाठविली. साहित्यिकांच्या बैठका, त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी, अशा अनेक गोष्टी केल्या. एवढेच नव्हे तर राजधानी दिल्लीतही आवाज उठविला. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होऊनही अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तो मिळणे ही मराठी माणसांसाठी अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांच्या प्रतिनिधीचे व साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीसाठी घेऊन जावे, अशी विनंती जोशी यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठी