शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; अर्ज कसा करायचा, लाभार्थ्यांचे निकष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:29 IST

प्रत्येक तीर्थस्थळासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड होते.

मुंबई - राज्य सरकारने ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेट देता यावी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे. यामध्ये मुंबई शहरातील १५०, उपनगरातील २५० अशा एकूण ४०० ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर दर्शनाचा लाभ घेतल्याचे आता समोर आले आहे.

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील ६६, तर देशातील ७३ महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शनाची सुविधा मिळते. यामध्ये  महाराष्ट्रातील ६६ तीर्थस्थळांमध्ये मुंबईतील १५, तर ठाण्याच्या २ तीर्थस्थळांचा समावेश आहे. पात्र व्यक्तीला प्रमुख तीर्थस्थळांपैकी कोणत्याही एका तीर्थयात्रेचा एकदाच लाभ घेण्याची सुविधा मिळते

अर्ज कसा कराल? पोर्टलवर ऑनलाईन वा स्वत: सेतू सुविधा केंद्रात अर्ज विनामूल्य भरता येतो. अर्ज भरताना अर्जदार प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक आहे. फोटो काढून केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. 

लाभार्थ्यांचे निकष काय? प्रत्येक तीर्थस्थळासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड होते. अतिरिक्त लोकांची प्रतीक्षायादी तयार केली जाते. अर्जदार पती, पत्नीपैकी एकाची निवड झाल्यास जोडीदाराला पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेते. अर्जदाराचे वय ७५ आणि त्यापुढील असल्यास सोबत जोडीदार वा एक साहाय्यक प्रवास करू शकतो.

एका टूरसाठी ८०० प्रवासी आवश्यक असल्याने मुंबईतून फक्त अयोध्येत श्रीराम मंदिर दर्शन टूर गेली आहे. यात मुंबई व ठाण्यातून  प्रत्येकी ४०० जणांचा समावेश होता - प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरtourismपर्यटन