सरकारचा हेतूच नाही : भाजपाने ठराव मांडावागोंदिया : राज्य सरकारने विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव आणल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चितपणे त्याला पाठिंबा राहील, मात्र विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव आणण्याचा भाजपा सरकारचा हेतूच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी केली. गोंदियात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान ते बोलत होते. विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची साथ मिळणार नसेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस साथ देईल. त्यासाठी सरकारने विदर्भ राज्याचा ठराव तर आणावा, असे पटेल यांनी सूचित केले.सत्तारूढ भाजपा सरकारला आम्ही त्या वेळी जो पाठिंबा दिला होता तो केवळ राज्यातील जनतेला स्थिर सरकार देण्यासाठी दिला होता. त्यामागे आमचा कोणताही हेतू नव्हता. आता सरकारने आमच्या सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला तर एकदाची होऊन जाऊ द्या चौकशी, म्हणजे लोकांच्या मनातील शंका तरी दूर होईल, असे खासदार प्रफुल्ल पटेल या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भावर ठराव आणा आम्ही पाठिंबा देऊ
By admin | Updated: December 28, 2014 01:25 IST