शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मी मंत्रीपद सोडतो, शेट्टी खासदारकी सोडतील का? सदाभाऊ खोत यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 04:16 IST

भाजपाच्या सहकार्यामुळे मिळालेले खासदारपद राजू शेट्टी यांनी आधी सोडावे, मग मीदेखील राज्यमंत्रीपद सोडेन, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपाच्या सहकार्यामुळे मिळालेले खासदारपद राजू शेट्टी यांनी आधी सोडावे, मग मीदेखील राज्यमंत्रीपद सोडेन, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले. आपल्या नव्या संघटनेच्या नावाची घोषणा २१ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात केली जाईल, असे त्यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.खोत म्हणाले, नवीन संघटनेच्या स्थापनेसाठी नवीन मसुदा समिती नेमण्यात आली आहे. ही १६ जणांची समिती संघटनेचे नाव ठरवेल. संघटनेचा झेंडा अन् अजेंडा शेतकºयांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आपण बाहेर पडलो नाही, तर आपल्याला काढण्यात आले. स्वाभिमानी संघटनेत असताना आपल्याला तीन पातळीवर लढा द्यावा लागत होता. मंत्री झाल्यानंतर शेतकºयांच्या आपल्याविषयी वाढलेल्या अपेक्षा, विरोधकांचा हल्ला आणि स्वकीयांच्या अंतर्गत कुरघोड्यांचा सामना करावा लागला. आपल्याच संघटनेने आपल्याविरुद्ध चौकशी समिती नेमली. आपला शेतकरी संघर्षाचा ३३ वर्षांचा अनुभव असताना त्यात कमी अनुभवाच्या सदस्यांची नेमणूक करून आपल्याला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या काळात आपल्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, रावसाहेब दानवे हे उभे राहिले. जे प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकले असते त्यासाठी मोर्चे काढून आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सदाभाऊ म्हणाले.राजू शेट्टींची आत्मक्लेश नव्हे, सदाभाऊक्लेश यात्राराजू शेट्टी यांना आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशी भीती निर्माण झाल्याने त्यांनी आपल्यावर आरोप केले. सरकार कर्जमाफीला तयार असतानाही त्यांनी काढलेला मोर्चा ही आत्मक्लेश यात्रा नसून सदाभाऊक्लेश यात्रा होती, असा टोला सदाभाऊंनी लगावला.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी