शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'पाच वर्षांपेक्षा नीचांकी पाऊस

By admin | Updated: August 9, 2015 20:58 IST

आॅगस्टपर्यंतची सरासरी : २०१३ मध्ये सर्वांत जास्त पाऊस

अनंत जाधव -सावंतवाडी तालुक्यात गेल्या पाच वर्षांतील आॅगस्टपर्यंतचा सर्वांत नीचांकी पाऊस यावर्षी पडल्याचे महसूल विभागाच्या पर्जन्य मोजणीतून पुढे आले आहे. आॅगस्ट २0१३ मध्ये सर्वाधिक ३३१७ मिलिमीटर पावसाची नोंद असून, तोच पाऊस यावर्षी निम्म्यावर आला असून, फक्त १७७५ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन महिन्यांत पाऊस आपली सरासरी पूर्ण करेल.जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याचे सांगितले जाते. दाट झाडी तसेच डोंगरदऱ्या, पश्चिम घाटातील प्रदेश, आंबोलीच्या पायथ्याचे गाव अशी अनेक वर्णने सावंतवाडी तालुक्याविषयी केली जातात. गेल्या पाच वर्षांत पावसानेही चांगली हजेरी लावत या सर्व बाबी खऱ्या ठरविल्या होत्या. मात्र, यावर्षी पावसाने या सर्व शक्यतांवर पाणी फेरले आहे. गेल्या पाच वर्षांत पावसाची सरासरी वाढणार, असे वाटत असतानाच ती आता अर्ध्याहून कमी पावसावर येऊन ठेपली आहे.सावंतवाडी तालुक्यात २०११ मध्ये २९७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर २०१२ मध्ये २२५० मिलिमीटर, २०१३ मध्ये ३३१७ मि.मी. एवढी असून, २०१४ मध्ये २२०१ मिलिमीटर, तर यावर्षी २०१५ मध्ये सर्वांत कमी १७७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात गेल्या चार वर्षांत आॅगस्टपर्यंत सरासरी दोन हजार मिलिमीटर पाऊस कोसळला. मात्र, यावर्षी २०१३ मधील पावसापेक्षा निम्माही पाऊस पडला नाही. आंबोलीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाची सरासरी कायम आहे; पण त्या प्रमाणात सावंतवाडी तालुक्यात पावसाला ही सरासरी गाठण्यात यश मिळाले नाही.दरम्यान, महसूल विभागाच्या पर्जन्यमापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आॅगस्टपर्यंतच्या पावसाची सरासरी घटली असली तरी पुढील दोन महिन्यांत पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजची सरासरी ही पुढील काही काळात मागील काही वर्षांशी मिळतीजुळती होईल, अशी शक्यता वर्तविली आहे.++सावंतवाडीत संततधारगेले चार दिवस अधूनमधून पडणाऱ्या पावसाने सावंतवाडी तालुक्यासह शहरात रविवारी पहाटेपासूनच संततधार बरसण्यास सुरुवात केली आहे.