शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १८ विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

By admin | Updated: June 21, 2016 15:43 IST

नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पश्चिम शाखेची धिम्या गतीने होत असलेली वाटचाल आणि उत्तरेकडील शाखेचा जोर कमी असल्याने देशभरातील ३६ विभागांपैकी १८ विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21 - नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पश्चिम शाखेची धिम्या गतीने होत असलेली वाटचाल आणि उत्तरेकडील शाखेचा जोर कमी असल्याने देशभरातील ३६ विभागांपैकी १८ विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यापैकी सौराष्ट, गुजरात, पूर्व राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून कमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. मान्सूनच्या पश्चिम शाखेची वाटचाल येत्या दोन ते तीन दिवसांत वेगाने झाली तर ही सरासरी भरून काढली जाण्याची शक्यता आहे. केरळला यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले तरी आतापर्यंत तेथे जोरदार पाऊस झाल्याने सरासरीच्या केवळ १ टक्का पाऊस कमी झाला आहे. तामिळनाडूला आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला असून तेथे सरासरीच्या १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या रायलसीमा, तेलंगणा भागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. पश्चिम व उत्तर शाखा अशा दोन्हीकडील पावसाचा लाभ झाल्याने आंध्र किनारपट्टी भागात सरासरीच्या ४५ टक्के इतका अधिक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या उत्तरेकडील शाखेने यंदा जोरदार मुसडी मारली असल्याने मंगळवारपर्यंत त्याने दिल्लीपर्यंत धडक मारली आहे. यामुळे उत्तराखंड, चंदीगड, दिल्ली, पंजाब, छत्तीसगड या भागात यंदा चांगला पाऊस झाला आहे. १ जून ते १९ जूनदरम्यान देशभर झालेल्या पावसानुसार सौराष्ट्र (-९९), गुजरात (-९९) आणि पूर्व राजस्थान (-६५), पश्चिम राजस्थान (-५२) येथे सर्वात कमी पाऊस झाला. मान्सूनच्या उत्तर शाखेचा जोरदार प्रवास झाला असला तरी तिच्यात फारसा जोर नव्हता. त्यामुळे तिच्या मार्गात येणाऱ्या ईशान्यकडील राज्यात जोरदार पाऊस झाला तरी ओरिसा, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन विदर्भातून झाले असले तरी आतापर्यंत विदर्भातही सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात पूर्वमोसमी व मोसमी पाऊस झाला असला तरी तो सरासरीपेक्षा अजूनही १७ टक्के कमी आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ४० टक्के आणि कोकणात ४७ टक्के कमी पाऊस झाला आहे. १ ते १९ जूनपर्यंतचा राज्यातील विभागावार पाऊस

विभाग          सरासरी   पाऊसपडलेला    पाऊस टक्केवारीकोकण           ३३१़४        १७६़४                   -४७मध्य महाराष्ट्र७६़३          ४५़८                       -४०मराठवाडा        ७९़५          ६६़१                      -१७विदर्भ              ७१़६         ४३़४                       -३९