शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१६ जिल्ह्यांत राबविणार कुष्ठरोग शोध अभियान

By admin | Updated: September 17, 2016 03:53 IST

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १० हजार १०३ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोधअभियान राबविण्यात येणार

मुंबई/ वर्धा : राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १० हजार १०३ कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोधअभियान राबविण्यात येणार आहे.कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, ठाणे, रायगड व पालघर या १६ जिल्ह्यांत हे अभियान राबविले जाईल. या अभियानामध्ये १६९ तालुके, १४ महानगरपालिका व ८८ नगरपालिकांचा समावेश आहे. ‘झीरो लेप्रसी मोहीम’ यशस्वी करू, असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीव्यक्त केला.डॉ. सावंत म्हणाले, या अभियानाअंतर्गत समाजातील संशयित कुष्ठरुग्ण शोधण्यात येतील. निश्चित निदान झालेल्या रुग्णांना तातडीने औषधोपचार सुरू करणे, हा अभियानाचा उद्देश आहे. भारतातील १३ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशातील एकूण १६३ जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.राज्यात चालू आर्थिक वर्षांत सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात असल्याचे दिसून आले. या जिल्ह्यात ५२२ रुग्ण आढळले आहेत. ठाणे, रायगड, पालघर तसेच मालेगाव येथे पल्सपोलिओ कार्यक्रम असल्याने तेथे १३ आॅक्टोबरपर्यंत अभियानातर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण ४ कोटी ९८ लाख लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी १ कोटी ५३ लाख शहरी भागातील व ३ कोटी ४५ लाख ग्रामीण भागातील लोकसंख्येचे उद्दिष्ट आहे.कुष्ठरुग्णांची संख्या जिल्हा रुग्णसंख्या प्रमाणगडचिरोली५२२४.५२चंद्रपूर८४८३.५९भंडारा३९३ ३.०४पालघर७२७२.९७धुळे ४८१२.१८गोंदिया२७११.९नंदूरबार३३५१.८९रायगड४३११.५२जळगाव६५९१.४५वर्धा२०३१.४५अमरावती३३०१.०६नागपूर४६१०.९२यवतमाळ२५४ ०.८५नाशिक५०५ ०.७७वाशिम९८०.७६ठाणे५८४०.६४