शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग वसाहत होणार कधी स्मार्ट?

By admin | Updated: July 26, 2016 21:16 IST

एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना

रवींद्र देशमुख,

सोलापूर : एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना कुमठानाका परिसरातील कुष्ठरोग रूग्णालय आणि वसाहतीच्या भग्नतेकडे झगमगाटाच्या मागे लागलेल्या महापालिकेचे पुरते दूर्लक्ष झाले आहे. वसाहतीतील सर्वच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. रूग्ण पत्र्याचे शेड बांधून जीवन कंठत आहेत.

लेप्रसी हॉस्पीटल आणि वसाहतीमध्ये ह्यलोकमतह्ण पोहोचल्यानंतर रूग्णांना आपले मन मोकळे करण्याची आणि समस्या मांडण्याची संधी मिळाली. या वसाहतीमध्ये सध्या ६४ रूग्ण आपल्या परिवारासह राहून उपचार घेतात. बरेच रूग्ण तेथे २०, ३० आणि ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. रूग्णांना चपाती, डाळ भाताचं भोजन दिलं जातं तत्पूर्वी सकाळी नास्ता अन् चहा मिळतो. महापालिकेने २५ मे १९८४ रोजी सिव्हील सर्जनकडून लेप्रसी रूग्णालयाने ताब्यात घेतले. त्यानंतर वसाहतीची दुर्दशाच सुरू झाली...कुष्ठरोगाचे रूग्ण व्यंकटेश कुलकर्णी सांगत होते.

किसन केशभट्ट जोशी हे गेल्या चाळीस वर्षांपासून कुटुंबासह वसाहतीत राहून उपचार घेत आहेत... काय करावे हो, आता माझे मेडिकल रिपोर्ट सगळे चांगले आहेत. मी लेप्रसी निगेटीव्ह आहे; पण समाजात जावून राहू शकत नाही. लोक स्वीकारत नाहीत. आमच्या पिढ्या मात्र निरोगी जन्मल्या, हेच सुदैव. एक मुलगी आहे. पुण्याला दिलंय तिला. तिचा संसार उत्तमपणे सुरू आहे. मी बारावी पास झाल्यानंतर मलेरिया सर्व्हीलन्स वर्कर म्हणून नोकरीला लागलो. मूळचा गुलबर्ग्याचा आहे... नोकरी उत्तमपणे सुरू होती; पण काम करीत असताना या रोगाची लागण झाली...याच आजाराची रूग्ण असलेल्या अनुसया कुलकर्णीबरोबर माझे लग्न झाले अन् आमचा संसार इथे सोलापुरात सुरू झाला...जोशी सांगत होते.

किसनराव म्हणाले,आमच्या वसाहतीला आता पुनर्वसनाची गरज आहे. सर्वत्र पडझड झाली आहे. बाहेरच्या लोकांनी अतिक्रमणही केले आहे. घरांच्या भिंती आणि छप्पर पडल्यामुळे आमचे लोक पत्र्याचे शेड उभारून राहत आहेत...व्यंकटेश कुलकर्णी यांनीही वसाहतीच्या अवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. रमानाथ झा यांच्यासारखा एखादा अधिकारी आला पाहिजे. झा यांनीच ही वसाहत महापालिकेच्या ताब्यात घेतली होती. त्यांना खूप सुधारणा करायच्या होत्या; पण त्यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याची नेहमीच बदली होते. पूर्वी १२५ एकराच्या विस्तीर्ण जागेत असलेली ही वसाहत आणि रूग्णालय अतिक्रमणामुळे आता केवळ आठ एकराची झाली आहे.-कुष्ठरोग वसाहतील पडझड झालेल्या घरांचे बांधकाम करावे. महापालिकेने आम्हाला उत्तमपणे आसरा देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मोकळ्या जागेत रूग्णांना उपयुक्त होतील, असे उपक्रम सुरू करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून अनुदान घ्यावे.- किसन जोशी, रूग्णमहापालिकेने आमची दूर्दशा केली आहे. या वसाहतीकडे कुणाचेच लक्ष नाही. महापालिकेचा कोणताही आरोग्य अधिकारी टिकून राहत नाही. त्यामुळे आमच्या समस्या टिकून राहून सोडविणार तरी कोण? आमची अशी अवस्था करणाऱ्या महापालिकेला महारोग्यांचा शाप लागेल.- व्यंकटेश कुलकर्णी