शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत दिवसा ढवळ्या बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये पसरली घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 20:26 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत चक्क आज दिवसा ढवळ्या बिबट्याची दहशत व वावर असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत चक्क आज दिवसा ढवळ्या बिबट्याची दहशत व वावर असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील इन्फिनिटी आयटी पार्कच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील गिरीकुंज सोसायटी इमारत क्रमांक 5 मध्ये गेली तीन दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी मध्यरात्री बिबट्या येतो. काल मध्यरात्री तर त्याने येथील एका भटक्या कुत्र्याची शिकार केली होती. मात्र आज चक्क दुपारी दीडच्या सुमारास येथील सोसायटीच्या मागील बाजूस बिबट्या येथील संरक्षक भिंतीवरून चालत असल्याचे येथील लहान मुलांच्या लक्षात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी टेरेस्वरून बिबटयाच्या वावराचे व्हिडिओ मोबाईल मध्ये बंदिस्त केले अशी माहिती या सोसायटीच्या रहिवासी डॉ. रामेश्वरी पाटील यांनी 'लोकमत'ला दिली.

सदर बिबट्या नंतर आज दुपारी साडे तीनच्या सुमारास इमारत क्रमांक 7 व 8 च्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवरून ऐटीतब चालताना नागरिकांनी पाहिला. बिबट्याचा वावर या भागात आज दुपारी होता. आता परत भक्ष्य शोधण्यासाठी मध्यरात्री बिबट्या परत येईल का या भीतीने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या बिबट्याच्या वावराचे व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले.

नोव्हेंबर 2018 मध्ये बिबट्या इमारत क्रमांक 5 मध्ये तीन चार वेळा इकडे आला होता. त्यावेळी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोंद, स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी येथे भेट देऊन सदर घटनेची दखल घेतली होती. आणि त्यांच्या आमदार निधीतून संरक्षक भिंत देखिल आम्हाला बांधून दिली होती अशी माहिती डॉ.रामेश्वरी पाटील यांनी दिली.

गेले तीन चार दिवस येथील बिबटयाचा असलेल्या वावराची आमदार सुनील प्रभू यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे तसेच वन विभागाचे सचिव व वन संरक्षक अधिकारी श्री. रामाराव वनसंरक्षक ठाणे विभाग यांच्याशी संपर्क साधून या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक पाठवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.

'लोकमत'ने रामाराव यांच्याशी संपर्क साधला असता, येथील बिबट्याच्या दहशतीची माहिती आमदार प्रभू यांनी आपल्याला दिली आहे. आमची टीम येथे पाठवत असून जर नागरिकांना बिबट्याचा त्रास होत असेल तर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव,नागपूर यांच्या परवानगीने येथे पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Mumbaiमुंबईleopardबिबट्या