शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत माजी सदस्यांना विधिमंडळाची आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:07 IST

आपल्या विनयशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने आदराचे स्थान निर्माण करणारे विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे, दिलदार स्वभावाचे माजी उपसभापती वसंत डावखरे आणि विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक माजी मंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर आदी दिवंगत सदस्यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : आपल्या विनयशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने आदराचे स्थान निर्माण करणारे विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे, दिलदार स्वभावाचे माजी उपसभापती वसंत डावखरे आणि विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक माजी मंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर आदी दिवंगत सदस्यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली.फरांदे हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत आदरणीय असे नेते होते. त्यांची कारकिर्द आणि विधिमंडळातील कामगिरीचा संदर्भ ग्रंथ विधानमंडळाने काढावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडताना केली. सर्व पक्षांमध्ये मैत्र जपणारे डावखरे यांच्या आठवणींना दोन्ही सभागृहांनी उजाळा दिला. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन संबंध जपणारे ते नेते होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली. शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष आणि श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे हे शिर्डीच्या विकासासाठी नेहमीच आग्रही असत, तर अलीकडे निवर्तलेले खासदार चिंतामण वनगा हे पक्षनिष्ठेचे आणि निष्कलंक नेता कसा असावा, याचे आदर्श उदाहरण होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या शिवाय, हफीज धत्तुरे, कमल देसाई, चंद्रकांत (चंदूकाका) जगताप या माजी सदस्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक प्रस्ताव मांडला, तर विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी शोक संवेदना व्यक्त केली.अनुशेषाचा अर्थ महाराष्ट्राला समजावून सांगणारा पहिला नेता, असा किंमतकर यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, मागास भागांचा अनुशेष हीच त्यांची जात, धर्म अन् पक्षही होता. अनुशेषाच्या मुद्द्यावर त्यांनी दिलेल्या लढ्यातील मीदेखील एक शिपाई होतो. मला हा विषय त्यांच्यामुळेच कळला. त्यांच्या निधनाने मागास भागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.