शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाच्या ‘आॅडिओ’चे कंत्राट रद्द

By admin | Updated: March 13, 2016 04:44 IST

मुंबईच्या विधानभवनातील विधिमंडळाची दोन्ही सभागृहे आणि सेंट्रल हॉलमधील ‘आॅडिओ कॉन्फरन्स’ यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याचे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वाकोला

मुंबई : मुंबईच्या विधानभवनातील विधिमंडळाची दोन्ही सभागृहे आणि सेंट्रल हॉलमधील ‘आॅडिओ कॉन्फरन्स’ यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याचे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वाकोला, मुंबई येथील मे. राम संगम इन्फोटेक कंपनीस दिलेले सुमारे तीन कोटी रुपयांचे कंत्राट उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केले आहे.या कामासाठी गेल्या २१ डिसेंबर रोजी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या व २८ जानेवारी रोजी मे. राम संगम कंपनीस कार्यादेश जारी करण्यात आला होता. याआधी गेल्या आॅगस्टमध्येही याच कंत्राटासंबंधीचा वाद उच्च न्यायालायत आला होता व तेव्हा झालेले युक्तिवाद लक्षात घेऊन सरकारने स्वत:च निविदा प्रक्रिया नव्याने करण्याचे ठरविले होते.आधी ज्यांनी याचिका केली होती त्याच गोरेगाव (मुंबई) येथील मे. हायटेक आॅडिओ सिस्टिम्स कंपनीने याही वेळी याचिका केली होती. सविस्तर सुनावणीनंतर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने याचिका मंजूर केली व मे. राम संगम कंपनीस दिलेला कार्यादेश रद्द केला. विधिमंडळाचे सध्याचे अधिवेशन सुरू होण्याच्या दोनच दिवस आधी हा निकाल दिला गेला. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याच्या निकालास, मे. राम संगम कंपनीच्या विनंतीनुसार, चार आठवड्यांची स्थगिती दिल्याने विधिमंडळाच्या कामात काहीच अडथळा येणार नाही, असे नमूद करून खंडपीठाने त्याप्रमाणे आपला निर्णय तहकूब ठेवला.मे. राम संगम कंपनी निविदेच्या अटींची पूर्तता करत नसूनही त्यांना कंत्राट दिले गेल्याने न्यायालयाने ते रद्द केले. एवढच नव्हे; तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या कंपनीस दिलेल्या कंत्राटाचे प्रतिज्ञापत्रात ज्या पद्धतीने समर्थन केले ते धक्कादायक असल्याचा अभिप्रायही न्यायालयाने नोंदविला. (विशेष प्रतिनिधी)