शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद बिनविरोध

By admin | Updated: June 4, 2016 03:45 IST

भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले

मुंबई : भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मागच्या दाराने का होईना, विधिमंडळात प्रवेश झाला.परिषदेच्या दहा जागांसाठी बारा अर्ज दाखल झाल्यामुळे घोडेबाजार होणार, अशी अटकळ होती. भाजपाचे पाच जण निवडून येणार असताना पक्षाने सहा उमेदवार दिले, तर भाजपाचेच मनोज कोटक यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांत खिंडार पाडण्यासाठीच भाजपाने चाल खेळल्याची चर्चा होती. मात्र, ‘निष्ठावंत की उपरे’ या वादामुळे नाराजांच्या नाकदुऱ्या काढता काढता भाजपा नेत्यांच्या नाकीनऊ आले होते. प्रवीण दरेकर आणि आर. एन. सिंह यांच्या उमेदवारीला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता. परंतु, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दरेकर आणि उत्तर भारतीयांचे नेते सिंह हे पक्षाला ‘मायलेज’ देऊ शकतात, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाराजांच्या गळी उतरविल्याने अखेर प्रसाद लाड आणि मनोज कोटक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी दहाच उमेदवार राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. अधिकृत घोषणा १२ जून रोजी करण्यात येईल.नारायण राणेंच्या ‘एन्ट्री’ने कॉंग्रेसला बळ गेल्या दोन वर्षांत सलग दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे आक्रमक नेते नारायण राणे यांचे या निवडणुकीतून विधान परिषदेत आगमन झाल्याने पक्षाचे बळ वाढले असून, सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला, तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: राणे कुडाळ मतदारसंघातून सेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाले. हे दोन्ही पराभव पचवून राणे पुन्हा वांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरले; पण तिथेही त्यांचा निभाव लागला नाही. शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.राणे यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. शिवाय, आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते सरकारला सळो की पळो करून सोडू शकतात. महायुतीसदाभाऊ खोत विनायक मेटे प्रवीण दरेकर आर. एन. सिंह सुजितसिंह ठाकूर सुभाष देसाईदिवाकर रावतेआघाडीनारायण राणेरामराजे नाईक निंबाळकर धनंजय मुंडे