शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

डान्सबार सुधारित विधेयकाला विधान परिषदेपाठोपाठ विधानसभेत मंजूरी

By admin | Updated: April 12, 2016 18:25 IST

राज्यातील डान्सबार नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने आणलेले सुधारित विधेयक सोमवारी विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आज विधानसभेतही याला मंजूरी मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - राज्यातील डान्सबार नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने आणलेले सुधारित विधेयक सोमवारी विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आज विधानसभेतही याला मंजूरी मिळाली आहे. बारबालांचे किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले असून, त्यांच्यावर पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्य सरकारचा डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कायद्याच्या मसुद्याचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची स्थापन केली होती. या समितीने नव्या सुधारित विधेयकाचा आढावा घेत, कठोर तरतुदी, अटींचा समावेश केला होता. ‘महाराष्ट्र हॉटेल रेस्टॉरंट व बार रूममध्ये चालणाऱ्या अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६’ अशा लांबलचक नावाने आलेल्या या सुधारित विधेयकानुसार, डान्सबारमधील आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे
 
अशा आहेत नव्या तरतुदी
 
- डान्सबारमध्ये नृत्य करणाऱ्यांचे किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले असून, बारमधील सर्व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक नोंद करून त्याची तपशीलवार माहिती ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
 
- सायंकाळी ६ ते रात्री ११.३० या वेळेतच डान्सबार चालविता येणार असून, बारबालांवर पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
- नृत्यमंचावर एका वेळी केवळ ४ जणांना डान्स करता येणार आहे, तसेच कोणत्याही प्रकारे अश्लील आणि महिलांच्या प्रतिष्ठेला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची बार मालकांना खात्री करावी लागणार आहे.
 
- सार्वजनिक क्षेत्र या व्याख्यांतर्गत येणाऱ्या बारमधील जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, ३० दिवसांचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असणार आहे. अशा विविध अटी आणि शर्ती सुधारित विधेयकात आहेत.
 
- डान्स बारमधील महिला व इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने पीएफ सुरू करणे अनिवार्य.
 
- आवश्यकतेनुसार पाळणाघराची सुविधा देण्यात यावी.
 
- परिमट रूम व नृत्य कक्षात विभाजक भिंत असावी. सर्व बाजूंनी तीन फूट उंचीचा कठडा घालून मंच तयार करावा.
 
- विनापरवाना डान्सबार सुरु केल्यास ५ वर्षापर्यंतची कैद आणि २५ लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
 
- डान्सबारमध्ये अश्लील नृत्य अथवा अनैतिक कृत्यांसाठी ३ वर्षांपर्यंतची कैद व १० लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
 
- डान्सबारमध्ये पैसे उधळणे, बारबालेशी लगट करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून या नियमाचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यापर्यंतची कैद व ५० हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.