शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 05:42 IST

शासकीय इतमामात औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कार

औरंगाबाद : फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा, जाणिवेचे समर्थ वाहक, मराठीतील कवी, विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘अस्मितादर्श’कार डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (८१) यांचे सोमवारी मध्यरात्री औरंगाबादेत निधन झाले. मंगळवारी सायंकाळी येथील छावणी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुली नंदिता व निवेदिता यांनी वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिला.काही महिन्यांपासून डॉ. पानतावणे यांची प्रकृती बरी नव्हती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद्मश्री किताब घेण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता आले नव्हते.भदंत प्रा. डॉ. सत्यपाल व भिक्खू संघाने सामूहिक बुद्धवंदना पठण केली. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुष्पचक्र वाहिले. सकाळपासून अनेक साहित्यिक व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री गंगाधर गाडे, आ. सुभाष झांबड, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, गंगाधर गाडे, सुधीर रसाळ, बाबा भांड, रा. रं. बोराडे, रतनकुमार पंडागळे, डॉ. ऋषिकेशकांबळे, मसापचे अध्यक्ष कौतिकरावठाले पाटील आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.मार्गदर्शक हरपला - मुख्यमंत्रीडॉ. पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. व्यासंगी प्राध्यापक, कृतिशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख त्यांनीनिर्माण केली. त्यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान 'अस्मितादर्श’क म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. विशेषत: साहित्यिकांच्या नव्या पिढीला अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध करून देण्यासह तिच्या वैचारिक जडणघडणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.दलित जाणिवेला आत्मभान देणारे साहित्यिकदलित साहित्याला वैचारिक दिशा देतानाच दलित जाणिवेला आत्मभान देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने साहित्य आणि समाजाची फार मोठी हानी झाली आहे. डॉ. पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या माध्यमातून शोषित, वंचितांना विचारपीठ मिळवून दिले. त्यांच्या साहित्यिक योगदानाची जागतिकस्तरावर दखल घेण्यात आली. वैचारिक लिखाणासोबतच समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. दलित चळवळीला विवेकाचे भान देणाऱ्या या ज्येष्ठ साहित्यिकाच्या निधनाने लोकमत परिवाराने आपला जवळचा मित्र गमावला आहे, अशा शब्दांत माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Dr.Gangadhar Pantawaneडॉ. गंगधर पानतावणे