शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वीज ग्राहकांना महावितरणकडून मिळणार एलईडी बल्ब

By admin | Updated: August 28, 2015 23:49 IST

सवलतीच्या दरात पुरवठा, वीज बचतीचे उद्दीष्ट.

बुलडाणा : घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्ब देऊन वर्षाला सुमारे १३00 दशलक्ष युनिट वीज बचत करण्याचा चंग महावितरणने बांधला आहे. या योजनेमुळे ग्राहकाच्या वीज बिलात वर्षाकाठी २00 ते ७00 रुपयांची बचत होऊ शकेल. राज्यात १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, डिसेंबर २0१५ पर्यत शासनाला एलईडी बल्ब वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे. या योजनेनुसार प्रत्येक ग्राहकाला ७ वॅट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्याची तरतूद आहे. त्याची किंमत १00 रुपये असेल. महावितरणाच्या एसएमएस, ईमेल किंवा कक्षावर यासाठी नोंदणी करता येऊ शकेल. केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटपाची योजना जाहीर केली असून, राज्याला भेडसावणार्‍या भारनियमनाच्या समस्येवर ही योजना प्रभावी ठरणार आहे.महाविरणची कार्यालये आणि काही निवडक बिल भरणा केंद्रांवर या बल्ब वाटपासाठी स्टॉल लावले जातील. चालू महिन्याचे भरलेले बिल आणि फोटो आयडी दाखविल्यानंतर ग्राहकाला हे बल्ब दिले जातील. ग्राहकांना एलईडी बल्बसोबत तीन वर्षाची गॅरेन्टीसुद्धा दिली जाणार आहे. या तीन वर्षात तांत्रिक कारणांमुळे बल्ब बंद पडल्यास तो महावितरणकडून मोफत बदलून दिला जाईल.*विजेची बचत करण्याचे उद्दीष्टमहावितरण कंपनी राज्यभरात सुमारे २ कोटी २0 लाख ६६ हजार ३७३ ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ६२ लाख ६१ हजार ३२0 घरगुती, ३६ लाख ६७ हजार ८८३ कृषी, १५ लाख ६९ हजार 0४३ वाणिज्यिक आणि ४ लाख ४८ हजार ३६६ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. विजेच्या तुटवड्यामुळे सर्वात जास्त फटका घरगुती ग्राहकांना बसतो. त्यामुळेच राज्यातील १ कोटी ६२ लाख घरगुती वीज ग्रहकांना एलईडी बल्ब देऊन, वीज बचतीचे लक्ष्य गाठण्याचा महावितरणचा प्रयत्न राहणार आहे.