शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग सोडून बोला - एसटी महामंडळ

By admin | Updated: May 30, 2017 04:22 IST

वेतनवाढ देण्यास एसटी प्रशासन तयार असतानाच कामगार संघटनेच्या आडमुठेधोरणामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळत नसल्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वेतनवाढ देण्यास एसटी प्रशासन तयार असतानाच कामगार संघटनेच्या आडमुठेधोरणामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संपाच्या पवित्र्यात आहे.एसटीमधील विविध कामगार संघटना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी संप करण्याच्या तयारीत आहे. मात्र अधिकृत संघटनांनी संप करण्याची नोटीस न देता संप पुकारणे हे नियमबाह्य आहे. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांचा अवधी दिल्यानंतर संप पुकारण्यात येतो. नियमानूसार वेतनवाढ हा एसटी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. एसटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर चर्चा करुन वेतन वाढ करण्यास एसटी प्रशासन तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एसटी उत्पादक महामंडळ असल्याने शासन पगारासाठी मदत करु शकत नाही.चार वर्षांनी एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होते. त्यामुळे यंदा वेतनवाढीसाठी एसटी प्रशासन तयार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सर्वात कमी आहे. आर्थिक नफा वाढवण्यासाठी एसटी लवकरच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ राबवणार आहे. मात्र कर्मचारी संघटनेच्या अवास्तव मागण्यांमुळे वेतन वाढ रखडली असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.जानेवारी २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. आॅक्टोबर २०१६ मध्ये वाटाघाटीस सुरुवात झाली. यानंतर प्रशासनासोबत १२ वेळा बैठक झाली. १३ एप्रिल १७ मध्ये राज्य परिवहन व शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामांचे स्वरु प वेगळे असल्याने सातवा वेतन आयोग शक्य नाही, असे शासनाचे म्हणणे आहे. १ जूनला राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात नोटीस देऊन संप पुकारण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे म्हणाले.