शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान; पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:49 IST

महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० जवानांशी छत्तीसगड सीमेवर झाली चकमक

गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील टेक्केमेटा ते मर्दानटोला पहाडाच्या परिसरातील जंगलात शनिवारी उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. यात चार पोलीस जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांची चहुबाजूंनी कोंडी केल्याने ते हतबल झाले. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने तब्बल २६ नक्षलवाद्यांचा वेध घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील मोठा शस्त्रसाठाही जप्त केला.मिलिंद तेलतुंबडे याचा मृतांमध्ये समावेश?सायंकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या चकमकीत काही मोठे नक्षल नेतेही मारले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत असलेला कडवा नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचा मृतांमध्ये समावेश असल्याची चर्चा आहे. तथापि, पोलिसांनी या शक्यतेला दुजोरा देण्यास नकार स्पष्ट दिला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, इतकेच पोलिसांनी सांगितले. मिलिंद तेलतुंबडे याच्या शिरावर ५० लाखांचे बक्षीस असून, पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले, पण तो हाती लागलेला नाही. गडचिरोलीच्या जंगलात चार वर्षांत झालेल्या मोठ्या चकमकी२२ एप्रिल, २०१८ : भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या जंगलात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले.२४ एप्रिल, २०१८ : कसनासूर चकमकीमध्ये पळून जाणाऱ्या १५ नक्षलवाद्यांचे मृतदेह इंद्रावती नदीपात्रात मिळाले.२५ एप्रिल, २०१८ : भामरागड तालुक्यातील नैनेरच्या जंगलात झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले, तर आधीच्या चकमकीतील दोन मृतदेह मिळाले.१९ ऑक्टोबर, २०२० : धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले.२१ मे, २०२१ : एटापल्ली तालुक्यातील कोटमीच्या जंगलात झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार झाले.जखमी पोलिसांवर नागपुरात उपचारया चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपुरात आणण्यात आले असून, ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.गृहमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुकपोलिसांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानाचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,’ अशा शब्दांत कौतुक केले. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असून ही राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील ही उल्लेखनीय कामगिरी ठरेल. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली