शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीची केवळ चर्चाच; अधिकृत प्रस्ताव नाही

By admin | Updated: January 24, 2017 22:50 IST

अकोल्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतची घडमोड जाणून घेतली असता आघाडीची चर्चा केवळ भाषणांपुरतीच असून अद्यापपावेतो दोन्ही पक्षांकडून औपचारिक सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी अनुकूल : आज मुंबईत होणाऱ्या बैठकीची प्रतीक्षाअकोला: राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत आघाडीसाठी काँंग्रेसकडून प्रस्ताव आला असल्याचे सांगत बुधवारी मुंबईत राज्य पातळीवर बैठक बोलावली आहे, अशी माहिती दिली. या माहितीच्या अनुषंगाने अकोल्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतची घडमोड जाणून घेतली असता आघाडीची चर्चा केवळ भाषणांपुरतीच असून अद्यापपावेतो दोन्ही पक्षांकडून औपचारिक सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी करीत मोर्चेबांधणी केली आहे. या दरम्यान राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढल्यामुळे या मोर्चेबांधणीचा पुनर्विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. त्याच वेळी आघाडीची चर्चा राज्य पातळीवर सुरू झाल्यामुळे स्वबळाची तयारी करीत असलेल्या राष्ट्रवादीला आघाडीचा राग आळवावा लागला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही स्वबळाची तयारी केली आहे; मात्र मतविभाजन टाळण्यासाठी आघाडीची भाषा सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी कायम ठेवली होती. भारिप-बमसं या पक्षासोबत आघाडीला काँग्रेसची पसंती होती व राष्ट्रवादीचाही पर्याय खुला ठेवत दिवाळीमध्ये ‘दिवाली मिलन’ भेट घेण्यात आली; मात्र आघाडीची चर्चा पुढे सरकली नाही. गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा आघाडीची चर्चा नेत्यांच्या भाषणातून सुरू झाली असली तरी या दोन्ही पक्षांनी अकोल्यात एकमेकांना अधिकृत प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बुधवारी मुंबई येथे पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत असून या बैठकीमध्ये राज्यातील मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडीबाबत चर्चा होणार आहे त्यामुळे या बैठकीत होणार निर्णय आघाडीची पुढील दिशा स्पष्ट करणारा ठरेल. -----------राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्यासाठी आम्ही तयार आहोत फक्त औपचारिक प्रस्ताव किंवा बैठक झालेली नाही. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.बबनराव चौधरी, महानगर काँग्रेस अध्यक्ष -----------प्रदेशाध्यक्षांनी सन्मानजनक आघाडीबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आज मुंबई येथे पार्लमेंटरी बोर्डची बैठक असून या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यावर या संदर्भात पुढे भूमिका स्पष्ट होईल.विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस