शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बेभान चालकांना कायद्याचा चाप

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे, दारू पिऊन गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहून नेणे यापुढे चांगलेच महागात पडणार आहे.

मुंबई : गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे, दारू पिऊन गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहून नेणे यापुढे चांगलेच महागात पडणार आहे. अशा कृती करणाऱ्या बेदरकार वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज ही माहिती दिली. दारू पिऊन वा अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालविणाऱ्यांचे लायसन्स तर रद्द केले जाईलच; पण त्यांच्यावरील खटला न्यायालयात चालेल तेव्हा त्यांना कैदेचीच शिक्षा करावी, अशी ठाम भूमिका सरकारच्या वतीने मांडली जाईल, असे रावते यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या नव्या नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार उत्सुक आहे.सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे दुचाकीचालकांना हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. या आदेशाची तसेच चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावण्याच्या आदेशाचीही राज्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. हेल्मेट न घालणारे वा सीटबेल्ट न लावणाऱ्यांचे दोन तास समुपदेशन करण्यात येईल आणि हे समुपदेशन अनिवार्य असेल, असे रावते यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)नजर सीसीटीव्हीची मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असेल. सीसीटीव्ही नेटवर्कमुळे गाड्यांचा क्रमांक टिपला जाईल आणि आरटीओतून त्या गाडीच्या मालकाचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. वाहनांच्या नंबर प्लेटना आरएफआयडी यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर त्या वाहनाबाबतची संपूर्ण माहिती तत्काळ मिळू शकेल, असे रावते म्हणाले.रिक्षा परवान्यांचे फेरवाटपराज्यात ६० हजार आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आॅनलाइन पद्धतीने लॉटरी प्रक्रिया राबवून हे परवाने दिले जात आहेत. त्यातील ५ टक्के परवाने हे महिलांसाठी आरक्षित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. हे परवाने घेणाऱ्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत ७0५ तळीराम अडकले जाळ्यातमुंबई - नववर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या तळीराम चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यात ७0५ तळीराम चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मुंबईत ९0 ठिकाणी नाकाबंदीसाठी २५0 अधिकारी आणि २,५00 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ७0५ तळीराम चालकांना पकडून प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची कारवाई केल्याचे वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले. उत्तर आणि पूर्व मुंबईत सर्वाधिक कारवाई झाली. मागील वर्षी ५२३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यात ३७0 दुचाकीस्वारांचा समावेश होता.विनाहेल्मेट सुसाटदारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करताना विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली. १ हजार ९0६ दुचाकीस्वारांना पकडण्यात आले. त्याचप्रमाणे १ हजार १३५ नो पार्किंग करणाऱ्या आणि ५९ बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.