शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
5
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
6
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
7
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
8
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
9
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
10
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
11
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
12
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
13
IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
14
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
15
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
16
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
17
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
18
Sheetal Chaudhary: शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
19
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
20
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

मराठी सक्तीच्या कायद्याबाबत विधि विभागाने १५ दिवसांत अभिप्राय द्यावा - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 06:56 IST

सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक झाली.

मुंबई : मराठी सक्तीच्या कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या मसुद्याबाबत विधि व न्याय विभागाने येत्या १५ दिवसांत अभिप्राय द्यावा, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मसुदा तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे सदस्य मधू मंगेश कर्णिक, कौतिकराव ठाले पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. रेणू दांडेकर, रमेश पानसे, दादा गोरे, रमेश कीर, विभावरी दामले, सुधीर देसाई आदी उपस्थित होते.

मराठी भाषेसाठी तज्ज्ञ समितीने सर्वच मंडळांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीबाबत आपला अहवाल आणि मसुदा दिला होता. मराठी भाषा विभागाने तयार केलेला इंग्रजी आणि मराठी मसुदा तपासून विधि व न्याय विभागाने १५ दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करावा, असे तावडे यांनी बैठकीत सांगितले. सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचे शिक्षण नेमक्या कोणत्या इयत्तेपर्यंत करण्यात यावे हे एकदा तपासून घ्यावे. हे तपासून घेताना इतर राज्यांमध्ये त्यांची मातृभाषा कितव्या इयत्तेपर्यंत सक्तीची करण्यात येते हेदेखील तपासून घेणे आवश्यक असल्याचे तावडे म्हणाले.

‘...त्यानंतरच मसुदा प्रसिद्ध होणार’विधि व न्याय विभागाने दिलेले अभिप्राय, मराठी भाषा विभागाने घेतलेली माहिती यानंतर पुन्हा एकदा याबाबत सखोल बैठक घेण्यात येईल. त्यानंतरच सूचना आणि अभिप्रायासाठी हा अधिकृत मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, असे तावडे म्हणाले. या वेळी शेलार यांनी अन्य राज्यांतील स्थानिक, प्रादेशिक भाषांचे शिक्षण याचाही सखोल अभ्यास करण्यात येणे गरजेचे असल्याचे म्हटले.