शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

दक्षिण भारतात शिजते लातूरची डाळ; कोट्यवधींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 1:29 AM

तीन हजार टन डाळीची दररोज निर्मिती

हरी मोकाशे लातूर : रेल्वेने पाणी आणावे लागलेल्या लातूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई असली तरी, अख्ख्या दक्षिण भारताला इथल्या डाळीचा गोडवा लागला आहे. जिल्ह्यातील दीडशे डाळ मिलमधून दररोज सुमारे तीन हजार टन डाळ तयार होत असून ही डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे.

लातूर जिल्हा डाळीच्या पिकांसाठी ओळखला जातो. विशेषत: तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही पिके घेतली जातात. लाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ हे नाव पडले, असेही म्हटले जाते. शिवाय, शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी लातूरला आणली जाते. येथील बाजार समितीत त्याच दिवशी माप होऊन शेतकऱ्यांना पैसे दिले जातात त्यामुळे राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला दर मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातून हा शेतमाल विक्रीसाठी येतो़ जिल्ह्यात डाळ निर्मितीचे १५० प्रकल्प असून ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत़ या प्रकल्पासाठी दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल तुरीची खरेदी केली जाते़ त्यातून दररोज ३० हजार क्विंटल अर्थात ३ हजार टन डाळ तयार होते. येथील डाळीस महाराष्ट्राबरोबर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांसह गुजरातमध्ये मोठी मागणी आहे़

लातूरच्या तूर डाळीसह विजय, जॅकी, काबुली हरभरा डाळीस सर्वाधिक मागणी असते, असे उद्योजक नितीन कलंत्री यांनी सांगितले.शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला हवा...सध्या तुरीस ५ हजारांपर्यंत तर हरभºयाला ३७०० रुपयांपर्यंत सर्वसाधारण दर मिळत आहे़ केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा हा दर कमी आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन इतर पिकांकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने नाफेड अंतर्गत जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरु करुन शेतमाल खरेदी करणे आवश्यक आहे, असे शेतकºयांनी सांगितले़१५ हजार मजुरांना रोजगाऱ़ डाळ उद्योगातून दररोज १५ हजार मजुरांना रोजगार मिळतो़ त्यात बाजार समितीतील हमाल-मापाड्यांची संख्या वेगळी. सदर व्यवसायात कौशल्य असलेल्यांना आणखी चांगला वाव आहे.