शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लातूरची तूरडाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! कोट्यवधींची उलाढाल, दर ८ हजारांपर्यंत जातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:43 IST

लातूर, नांदेडसह विदर्भ, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमाभागातील शेतकरी तूर विक्रीसाठी लातूरची बाजारपेठ निवडतात.

हरी मोकाशे   लातूर : गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे महाराष्ट्रातील डाळींचा लौकिक आधी दक्षिण भारतात आणि आता परदेशातही झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई अन् अमेरिकेतही मागणी वाढली आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक अन् तेलंगणाच्या सीमाभागातून आलेल्या तुरीद्वारे लातूरच्या १५० कारखान्यांमध्ये दररोज एकूण ३ हजार १५० टन डाळीची निर्मिती होत आहे.  

लातूर, नांदेडसह विदर्भ, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमाभागातील शेतकरी तूर विक्रीसाठी लातूरची बाजारपेठ निवडतात. बाजार समितीत शेतमालाचा वेळेवर मापतोल व शेतकऱ्यांना लगेच पट्टी मिळते. येथे तूरडाळ निर्मितीचे प्रकल्पही दीडशेवर गेले असून, ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहे. 

शेतकऱ्यांना किती मिळेल भाव?सहा महिन्यांपूर्वी तुरीने उच्चांकी भाव गाठल्याने शेतकऱ्यांनी तूर उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले. राज्यातील लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने आवकही वाढली. परिणामी, दर उतरले असून, सध्या ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे दर ८ हजारांपर्यंत पोहोचतील, असा डाळ उद्योजकांचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या तूरडाळीमध्ये लातूर ब्रॅण्ड जगभर जात आहे. १५० कारखान्यांमधून २० हजार जणांना रोजगार मिळतो. तुरीचे दर कमी-जास्त झाले तरी लातूरच्या डाळीची गुणवत्ता कायम आहे. त्यामुळे इथल्या डाळीला दक्षिण भारतात सर्वाधिक मागणी आहे. देशातील मोठे व्यापारी हीच डाळ पॅकेजिंग करून निर्यात करीत आहेत. - नितीन कलंत्री, डाळ उद्योजक