मिरज : मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची योजना लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरजेत रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईन करण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने ते अद्यापि सुरू झालेले नाही. त्यामुळे पाणी एक्सप्रेसला अडथळा निर्माण झाला आहे.या योजनेला प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर युद्धपातळीवर काम सुरु झाले असून दि. १४ रोजी मिरजेतून लातूरसाठी पाणी एक्स्प्रेस रवाना होईल, असा दावा केला जात होता. परंतु वाघिणीत पाणी भरण्यासाठी मिरजेत रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुमारे एक कोटी ८४ लाख खर्चून पाईपलाईन करण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. (प्रतिनिधी)
लातूरला पाणी देण्यात अडथळा
By admin | Updated: April 9, 2016 03:36 IST