शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

संभाजीराव पाटलांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूर जिल्ह्यात जल्लोष

By admin | Updated: July 8, 2016 15:06 IST

भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूरसह निलंगा, औराद शहाजानी, देवणी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. ८ -  निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूरसह निलंगा, औराद शहाजानी, देवणी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी पेढे, साखर वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला़राज्याच्याच नव्हे तर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान असणाऱ्या लातूर जिल्ह्यास गेल्या दोन वर्षांपासून मंत्रिपद मिळाले नव्हते़ त्यामुळे जिल्हावासीयांच्या लाल दिव्याकडे नजरा लागून होत्या़ अखेर निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे़ आ़ संभाजीराव पाटील यांनी शुक्रवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच इकडे लातूर, निलंगा, देवणी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी व आ़ पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला़लातूर शहरात महात्मा बसवेश्वर चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला़ यावेळी महाराष्ट्र स्टुडंस् फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती़ निलंगा येथील छत्रपती शिवाजी चौक, मॉ जिजाऊ चौक, शिवाजीनगर हाडगा रोड, आनंदमुनी चौक, दापक वेस, कासाशिरसी मोड, जुनी पेठ, छत्रपती संभाजी चौक येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे, साखर वाटून तसेच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला़ यावेळी दगडू सोळुंके, रमेश सातपुते, राम पाटील, राम भंडे, आनंद अट्टल, विक्रम मोहळकर, सत्यवान धुमाळ, सिध्दू कांबळे, विकास उजळे, बाळू माने, विठ्ठल व्होरा, विठ्ठल पांचाळ, शकील शेख, तुकाराम माळी आदींची उपस्थिती होती़तसेच निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील चौकाचौकांत पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला़ यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रदीपकुमार पाटील, उपसभापती लक्ष्मण आकडे, संचालक नारायण बियाणी, सुधाकर शेटगार, सुभाष डावरगावे, तानाजी बिरादार, शिवपुत्र आग्रे, बालाजी पाटील, सतीश कत्ते, रावसाहेब मुळे, कुमार मंडगे, निर्भय पिचारे, रमेश क्षीरसागर, माजी सरपंच डॉ़ मल्लिकार्जून शंकद, पंचायत समिती सदस्य रज्जाक रक्साळे, मल्लिकार्जून लातुरे, शाहूराज थेटे, दीपक चांडक, सुभाष डावरगावे आदी उपस्थित होते़ निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी येथेही भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला़ यावेळी वैजनाथ अष्टुरे, राजेश कोतवाल, अमर पाटील, रमेश मन्सुरे आदी उपस्थित होते़

हे तर संभाजीरावांच्या कामाचे कौतुकआमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कष्टाचे चीज झाले आहे़ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक लढे दिले आहेत़ अखेर पक्षश्रेष्ठीने त्यांना कॅबिनेटमंत्रीपद देऊन कामाचे कौतुक केले आहे़ सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे संभाजीराव नक्कीच मंत्रिपदाला न्याय देतील, अशी अपेक्षा त्यांच्या मातोश्री माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली़

धडाडीचे नेतृत्वमाझे पती म्हणून मी बोलत नाही़ प्रस्थापितांच्या विरोधात निलंगा तालुक्यात मोट बांधून संभाजीरावांनी सामान्यांना न्याय दिला आहे़ आता त्यांच्याकडे मंत्रीपद आले आहे़ मराठवाड्यातील आघाडीचे नेतृत्व ते सिध्द करतील़ यात शंका नाही आणि मंत्रीपदातून जनतेची सेवाही करतील, याची खात्री असल्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी प्रेरणाताई निलंगेकर म्हणाल्या़