शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये मुलाने वडिलांना आत्महत्या करण्यापासून रोखलं

By admin | Updated: April 25, 2016 13:09 IST

अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे

ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. 25 – अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे. धनराज शिंदे असं या शेतक-याचं नाव आहे. लातूरच्या शिरपूर अनंतपाल गावातील ही घटना आहे.
 
धनराज शिंदे नेहमीप्रमाणे शेतात चालले होते. मात्र त्यांनी आपली सामानाची बॅग, फोन काहीच घेतलं नसल्याचं त्यांचा 14 वर्षीय मुलगा पृथ्वीराजच्या लक्षात आलं, आणि लगेच त्याने वडिलांना रोखलं. 'मी त्यांना दोर गुंडाळताना पाहिलं होतं. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही आत्महत्या केलीत तर तुमच्यानंतर आमची काळजी घेण्यासाठी कुणीच नसेल', असं पृथ्वीराजने वडिलांना सांगितलं. त्यानंतर भावनिक झालेल्या धनराज शिंदे यांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला.
धनराज शिंदे यांची तीन एकर जमीन आहे. सलग 3 वर्ष शेतीतून काहीच उत्पन्न मिळालेलं नाही. पहिल्या वर्षी गारपीटीमुळे शेतीचं नुकसान झालं. आणि त्यानंतर सलग दोन वर्ष दुष्काळामुळे काहीच शेती झाली नाही. धनराज शिंदे यांना एक मुलगा आणि चार मुली आहेत. त्यांच्यावर 15 लाखांच कर्ज आहे तरीही त्यांनी आपला लढा सुरु ठेवला होता. वायरलेस ऑपरेटरसाठी त्यांच्या मुलीला नोकरी मिळाली आहे. पण स्थानिक शासकीय कर्मचारी दिरंगाई करत असल्याने त्यांचा तणाव वाढला होता.
'माझ्या मुलांची खुप स्वप्ने आहेत. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचं आहे. जर निसर्गाने साथ दिली नाही तर त्यांच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकणार नाही', अशी भीती धनराज शिंदे व्यक्त करत आहेत. त्यांच्या 26 वर्षीय अर्चना या मुलीला संस्कृतमध्ये राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. तर त्यांचा मुलगा पृथ्वीराजला आयएएस अधिकारी बनायचं आहे.
 
'माझ्या मुलाने आत्महत्या करण्यापासून रोखलं नसतं तर काय झालं असत ? माझं कर्ज फेडण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. माझ्या मुलांच्या अपेक्षा पुर्ण करणं हे प्रत्येक दिवशी माझ्यासाठी एक आव्हान आहे', असं धनराज शिंदे बोलले आहेत