शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

दिवंगत भालचंद्र देशमुख उत्तम प्रशासक, मरणोत्तर पुरस्कार : उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:20 IST

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कार माजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कार माजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रीय यांनी बुधवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते हा पुरस्कार दिवंगत भालचंद्र देशमुख यांच्या वतीने स्वीकारला.दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर या तीन पंतप्रधानांसोबत महत्त्वाची कामगिरी बजावलेले सनदी अधिकारी दिवंगत भालचंद्र देशमुखांनी कॅबिनेट सचिव या सर्वोच्च पदावर काम करण्यापूर्वी मुंबई महापालिकेचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव या पदांसह केंद्र सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले. प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत लोक प्रशासनात अनेक आदर्श पायंडे देशमुखांनी पाडले.भारतीय राजकारणातल्या अद्वितिय घटनांची साक्ष देणारे व भारताच्या अलौकिक ग्रंथसंपदेत मोलाची भर घालणारे ‘पुना टू प्राइम मिनिस्टर्स आॅफिस’,‘अ कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्स अ लाऊ ड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराउंड’, ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक’यासह अनेक ग्रंथ भालचंद्र देशमुखांनी लिहिले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ)मध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलेले देशमुख जनवाणीचे अध्यक्ष होते. भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्रातील क्षेत्रिय संस्थेची सूत्रेही अनेक वर्षे सांभाळली. सनदी नोकरशाहीला मार्गदर्शन करणाºया या संस्थेला त्यांनी १0 लाखांची देणगी दिली. देशमुखांच्या चौफेर कारकिर्दीच्या स्मृतीप्रित्यर्थ या संस्थेत प्रतिवर्षी मान्यवर वक्त्यांचे व्याख्यान व निबंध स्पर्धा आयोजित केली जाते.भारत सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भालचंद्र देशमुख पुण्यात स्थायिक झाले. शासनाच्या कामकाजावर जनतेचा विश्वास वृध्दिंगत व्हावा या हेतूने ‘पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या संस्थेच्या स्थापनेत व उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्यात अनेक स्वयंसेवी संस्थांचे अध्यक्ष, विश्वस्थ या नात्याने समाजसेवेची अनेकविध कामे, देशमुखांच्या हातून घडली.