शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lata Mangeshkar: मोठी बातमी! गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 12:16 IST

Lata Mangeshkar: कोरोनाची लागण झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, आता त्यांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितल्यानुसार, लता दीदी कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत असून, व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला आहे.

व्हेंटिलेटर सपोर्ट काढलागेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्या व्हेंटिलेटरवर होत्या, मात्र आता त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे. न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बऱ्या झाल्या आहेत, अशी माहिती टोपेंनी दिली. 

अशक्तपणामुळे उपचार सुरूटोपे पुढे म्हणाले की, लता दीदी कोरोनातून ठीक झाल्या आहेत पण, सध्या ब्रेन इन्फेक्शन आहे. यामध्ये सुधारणा करण्याबाबत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या लता दीदी डोळे उघडत आहेत आणि थोडं बोलतही आहेत. त्या डॉक्टरांच्या उपचाराला चांगला प्रतिसादही देता आहेत. सध्या काही प्रमाणात त्यांना अशक्तपणा आहे, त्यावर उपचार सुरू आहेत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

दरम्यान कालदेखील लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. लतादीदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतीत सामदानी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्या