शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरती अंकलीकर-टिकेकर यांना जीवनगौरव; अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 07:40 IST

प्रकाश बुद्धिसागर, शुभदा दादरकर यांचाही 'जीवनगौरव'ने होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, सन २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या विविध पुरस्कारांची मंगळवारी घोषणा केली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना, संतसाहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार (२०२३) शशिकला झुंबर सुक्रे यांना घोषित झाला असून, २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे.

इतर पुरस्कारांचे मानकरी

  1. नाटक - विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत डॉ. विकास कशाळकर
  2. कंठसंगीत - सुदेश भोसले, लोककला अभिमन्यू धर्माजी सावदेकर
  3. शाहिरी - शाहीर राजेंद्र कांबळे
  4. नृत्य - सोनिया परचुरे
  5. चित्रपट - रोहिणी हटंगडी
  6. कीर्तन प्रबोधन - संजयनाना धोंडगे
  7. वाद्यसंगीत - पांडुरंग मुखडे
  8. कलादान- नागेश सुर्वे (ऋषीराज)
  9. तमाशा - कैलास मारुती सावंत
  10. आदिवासी गिरीजन - शिवराम शंकर धुटे

जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत वाढ

  • सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पूर्वी रोख रक्कम ५ लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे होते; ते आता रुपये १० लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे करण्यात आले आहे.
  • राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, आता या पुरस्काराचे स्वरूप रुपये तीन लाख रोख, मानपत्र व मानचिन्ह असे करण्यात आले आहे.
टॅग्स :Anuradha Paudwalअनुराधा पौडवाल