शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सरत्या वर्षाने मुद्रांकातून दिला ४० हजार कोटींचा महसूल; उद्दिष्टपूर्तीसाठी 3 महिन्यांत आणखी ₹१५ हजार कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:36 IST

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केला होता. गेल्या वर्षी राज्यभरात २७ लाख ९० हजार १९१ दस्तांच्या नोंदणीतून हा महसूल जमा झाला होता. 

पुणे : सरत्या वर्षाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारला तब्बल ४० हजार १९६ कोटी रुपयांचा महसूल गोळा करून दिला आहे. विविध दस्तांच्या नोंदणीतून मिळणारा हा महसूल जीएसटी विभागानंतरचा सर्वाधिक महसूल असतो. राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ५५ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, पुढील तीन महिन्यांत विभागाला आणखी पंधरा हजार कोटी रुपये महसूल आणून देणे अपेक्षित आहे.

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केला होता. गेल्या वर्षी राज्यभरात २७ लाख ९० हजार १९१ दस्तांच्या नोंदणीतून हा महसूल जमा झाला होता. 

नऊ महिन्याचा विक्रम- विभागाने ऑक्टोबरमध्ये ५ हजार ३१ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. गेल्या नऊ महिन्यांतील हा विक्रम आहे.- त्या खालोखाल ऑगस्टमध्ये ५ हजार ३१ कोटी, तर डिसेंबरमध्ये ४ हजार ७६९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

आतापर्यंत सुमारे ४० हजार १९६ कोटींचा महसूल जमा झाला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी १५ हजार कोटींची गरज आहे. नोंदणी विभाग हे उद्दिष्ट सहज साध्य करेल.- रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे

महिनानिहाय दस्तसंख्या महसूल (कोटींमध्ये)महिना    दस्तसंख्या    महसूलएप्रिल    २,२४,३१८    ३७६७.४१मे    २,५२,३३१    ४३३५.४०जून    २,०५,९०७    ४४००.११जुलै    २,४४,२११    ४७००.८१ऑगस्ट    २,३५,४६७    ५०३१.९२सप्टेंबर    १,८५,४२९    ३९९८.५८ऑक्टोबर    २,३३,००८    ५०८६.३९नोव्हेंबर    १,७९,२०७    ३९९५.३९डिसेंबर    २,४२,०४२    ४८८०.८६

५५ हजार कोटींचे लक्ष्यत्यानंतर राज्य सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी विभागाला ५५ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे.एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात विभागाने आतापर्यंत २० लाख १ हजार ९२० दस्तांची नोंदणी केली असून, त्यातून ४० हजार १९६ कोटींचा महसूल गोळा झाला आहे.उद्दिष्टपूर्तीसाठी विभागाला अजून तीन महिन्यांचा अवकाश असून, त्यात पंधरा हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करावा लागणार आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारRevenue Departmentमहसूल विभाग