शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दहा महिन्यात १२८ तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात!

By admin | Updated: October 25, 2014 23:53 IST

राज्यात ११00 तक्रारी : १0६६ गुन्हे दाखल

खामगाव (बुलडाणा): राज्यात गत दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १२८ तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एसीबीकडे १ जानेवारी ते २२ ऑक्टोबर २0१४ या कालावधीत लाच मागि तल्याच्या सुमारे ११00 तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी १0६६ तक्रारींच्या अनुषंगाने लाच स्वीकारणांर्‍याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये तब्बल १२८ तलाठय़ांचा समावेश आहे. भ्रष्टाचार आणि लाचलुचपतीस आळा घालण्यासाठी एसीबीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये धडक मोहिमेअंतर्गत सुमारे ११00 तक्रारींची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पट आहे. त्यामुळे लाच स्वीकरताना रंगेहात पकडल्या गेलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. पकडल्या गेलेल्यांच्या यादीत तलाठय़ांपाठोपाठ, शासकीय व निमशासकीय सेवांमधील अभियंत्यांचा क्रमांक लागतो. गत दहा महिन्यात एकूण ६७ अभियंत्यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. यादीत तिसर्‍या स्थानावर डॉक्टर आहेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील व्यक्तींनाही लाचखोरीचा मोह आवरत नसल्याचे वास्तवही या आकडेवारीवरून समोर आले असून, राज्यातील २६ शिक्षकांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ११ वकीलही अडकल्याची माहिती असून, २९ लोकप्रतिनिधींवरही कारवाईची तलवार लटकलेली आहे. *महसूल कर्मचा-यांच्या विरोधात ३६0 तक्रारीनागरिकांशी थेट संबंध येत असलेल्या महसूल विभागात मोठय़ा प्रमाणात लाच स्वीकारल्या जात असल्याची वस्तुस्थिती या आकडेवारीवरून समोर आली आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत लाचखोरीच्या तब्बल ३६0 तक्रारी, एकट्या महसूल विभागातील कर्मचार्‍यांच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. त्यापाठोपाठ गृह विभागातील कर्मचार्‍यांच्या विरोधात ३३८, तर ग्रामविकास खात्यातील कर्मचार्‍यांच्या विरोधात १५३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांनतर नगर विकास, शिक्षण, आरोग्य व महावितरणचा क्रमांक लागतो.