शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री हज यात्रेकरूंचे अखेरचे विमान मुंबई विमानतळावरून करणार ‘जेद्दाह’च्या दिशेने ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:17 IST

भारतीय हज कमिटीच्या वतीने वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त दोन विमानांपैकी अखेरचे विमान हज यात्रेकरूंना घेऊन आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणार आहे.

ठळक मुद्देमुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणारयात्रेक रुंचे एक विमान रविवारी दुपारी सौदीच्या दिशेने झेपावलेहज यात्रेला येत्या बुधवारपासून (दि.३०) सुरूवात होणार आहे यंदा हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने यात्रेकरूंना सिमकार्ड सौदीचे

अझहर शेख / नाशिक : भारतीय हज कमिटीच्या वतीने वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त दोन विमानांपैकी अखेरचे विमान हज यात्रेकरूंना घेऊन आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणार आहे.यावर्षी देशभरातून सुमारे १ लाख ४५ हजार मुस्लीम बांधव यात्रेसाठी रवाना झाले आहेत. यामध्ये महाराष्टतून साडे अकरा हजार यात्रेक रुंचा समावेश असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून ११५० यात्रेक रुंचा समावेश आहे. यावर्षी वीस टक्क्याने यात्रेकरू वाढले आहेत. सौदी सरकारकडून वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचा लाभ महाराष्टला मिळाला आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेदहा हजार यात्रेकरु महाराष्ट्रातून रवाना झाले होते.

प्रतीक्षा यादीमधील यात्रेकरुंपैकी सहाशे यात्रेकरू लकी ठरले आहे. वीस टक्के लाभ मिळाल्यामुळे या यात्रेकरुंनाही हज यात्रेची संधी उपलब्ध झाली. यात्रेक रुंचे एक विमान रविवारी दुपारी सौदीच्या दिशेने झेपावले. दुसरे विमान मध्यरात्री टेकआॅफ करणार असल्याची माहिती नाशिकचे हज कमिटीचे समन्वयक जहीर शेख यांनी दिली आहे. हज यात्रेला येत्या बुधवारपासून (दि.३०) सुरूवात होणार आहे. संपुर्ण यात्रा चाळीस दिवसाची असते. बकरी ईदच्या दिवशी यात्रेमधील मुख्य हजचा विधी पुर्ण होणार असून तेथून पुढे चार दिवस यात्रा सुरू राहणार असल्याची माहिती हज समितीच्या सुत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील यात्रेकरुं चे अखेरचे विमान आज मध्यरात्री उड्डाण करणार आहे. यंदा हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने यात्रेकरूंना सिमकार्ड सौदीचे पुरविण्यात आल्यामुळे यात्रेकरुंचा संपर्क तुटण्याची शक्यता धुसर झाली आहे.