शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय केले ५८ वरून ६० वर्षे, एमपीएससीचे विद्यार्थी संतप्त

By अतुल कुलकर्णी | Updated: June 6, 2018 02:48 IST

सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला तर लाखो बेरोेजगार युवकांत तीव्र असंतोष होईल हे लक्षात आल्यानंतर मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा धक्कादायक प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात घडला आहे.

मुंबई : सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला तर लाखो बेरोेजगार युवकांत तीव्र असंतोष होईल हे लक्षात आल्यानंतर मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा धक्कादायक प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात घडला आहे. ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या २२६ डॉक्टरांना सेवेत कायम ठेवण्याचा आदेश मंत्रिमंडळाची किंवा वित्त विभागाची कोणतीही मान्यता न घेता काढला गेला आहे.आरोग्य विभागाचा हा निर्णय मंत्रिमंडळाने नाकारला तर या सर्व डॉक्टरांवर ३१ मेनंतर झालेल्या खर्चाचा अनाठायी भुर्दंड सरकारी तिजोरीवर पडणार आहे. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर यांनी भूमिका बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. या यादीत त्यांचा आणि त्यांच्या पत्नी डॉ. सरोजनी बिलोलीकर यांचाही समावेश आहे. स्वत:ची सेवानिवृत्तीही या पती-पत्नींनी दोन वर्षे लांबवली आहे. याबद्दल डॉ. बिलोलीकर यांना विचारले असता ते म्हणाले, मी आता नोकरीला कंटाळलो आहे, मी व्हीआरएस घेणार आहे. आपण व्हीआरएसचा अर्ज दिला आहे का, असे विचारले असता अजून अर्ज दिलेला नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सूत्रांनुसार ही यादी केवळ २२६ अधिकाºयांपुरती मर्यादित नाही, तर मंत्रिमंडळाचा निर्णय होईपर्यंत दरमहिन्याला सेवानिवृत्त होणाºया अधिकाºयांनाही आता हाच नियम लागू राहणार आहे. याचा आधार घेत आता अन्य विभागांनीही आपापल्या अधिकाºयांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत....त्यांची भूक अजूनही भागत नाहीया निर्णयामुळे एमपीएससी स्टुडंट्स राईट्स ही चळवळ चालवणाºया लाखो मुलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आमच्या वयाची ३४ वर्षे होत चालली, आम्हाला नोकºया नाहीत, आमचे उभे आयुष्य कसे जाणार याची चिंता असताना जे निवृत्त झाले, ज्यांचे संसारही सुखाचे झाले त्यांची भूक अजूनही भागत नाही. सरकारदेखील या अधिकाºयांच्या दबावाला बळी पडून वय वाढविण्याचे निर्णय घेत आमच्याच पोटावर पाय देत आहे. हे कसली बेरोजगारी दूर करणार, असा संतप्त सवाल या चळवळीचे एक प्रमुख महेश बडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. ११ जून रोजी एमपीएसच्या मुलांची राज्यस्तरीय बैठक पुण्यात होणार आहे. त्या वेळी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही बडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Employeeकर्मचारी