शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘टायगर’ने घेतला अखेरचा श्वास

By admin | Updated: July 24, 2016 03:33 IST

मुंबई वरील २६/११ चदहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल मध्ये तब्बल आठ दिवस ड्युटी बजावलेल टायगर या श्वानाचे आजदुपारी विरारजवळील फिजा फार्म हाऊसमध्ये निधन झाले.

वसई : मुंबई वरील २६/११ चदहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल मध्ये तब्बल आठ दिवस ड्युटी बजावलेल टायगर या श्वानाचे आजदुपारी विरारजवळील फिजा फार्म हाऊसमध्ये निधन झाले.त्याच पार्थिवावर श्वान पथकातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.२००४ मध्ये गोरेगाव श्वानपथकात टायगर दाखल झाला होता. त्यानंतर २०१५ पर्यंत त्याने पोलिसांसाठी काम केले. मे २०१५ ला निवृत्त झाल्यानंतर टायगरला विरार येथील फिजा शहा यांच्या फिजा फार्ममध्ये ठेवण्यात आले होते. आजदुपारी टायगरने याठिकाणी शेवटचा श्वास घेतला.२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्यात टायगरने महत्वाची कामगिरी केली होती. आठ दिवस ताज हॉटेलबाहेर ड्युटीवर असलेल्या टागरने आरडीएक्स शोधून देण्यात पोलिसांना मदत केली होती. यावेळी पोलिसांच्या शोध मोहिमेत टायगरने मोलाची कामगिरी केली होती. त्याआधी टायगरने२००६ साली कांदीवली येथील एका झोपडपट्टीतून जिवंत गावठी बॉम्ब शोधून काढला होता. त्यानंतर २००८ साली पवई हिरानंदानी हॉस्पीटलजवळ जिवंत बॉम्ब शोधण्यात पोलिसांना मदत केली होती. (प्रतिनिधी)टायगर अतिशय शांत आणि मनमिळावू होता. बॉलने खेळायला त्याला खूप आवडाचे, असे पोलीस उपनिरीक्षक इम्रान पटेल यांनी सांगितले. फिजा फार्ममध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मोलाची कामगिरी केलेल्या सुलतान या श्वानालाही ठेवण्यात आले होते.त्याचेही काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी निधन झाले होते. त्यानंतर टायगरचे निधन झाले. देशाची ेगरज असलेल्या श्वानांना तीन महिन्यांपासून सेवेत दाखल केले जाते. त्यानंतर त्यांना १० वर्षे सेवेत ठेवले जाते. यादरम्यान त्यांना सततकाम असल्याने ते थकून जातात. म्हणूनश्वानांना सहा महिन्यातून किमान दहा दिवससुट्टी देऊन दुसऱ्या जगात खुले आम फिरण्यासाठी सोडले पाहिजे. त्यामुळे ते लवकर थकणार नाहीत आणि त्यांचे आयुष्यमानही उंचावेल, असे फार्र्मच्या फिजा शहा यांनी सांगितले. सुलतान, मॅक्सनंतर टायरगरनेही घेतला निरोपमुंबई : शहराच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मुंबई पोलिसांना साथ देण्याचे काम पोलीस दलाचे श्वानपथक करत असतात. गेल्या काही दिवसात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या सुलतान, मॅक्स नंतर टायगरनेही जगाचा निरोप घेतल्याने मुंबई पोलीस दलात शोककळा पसरली आहे.मुंबई पोलिसांनी बॉम्बशोधक पथकांमध्ये टायगरच्या धाडसी कामगिरीमुळे तो सर्वांच्या जवळ होता. गोरेगाव येथील बॉम्बशोधक पथकांत टायगर, सुलतान, मॅक्स आणि मर्सी या श्वानांचा एकच दबदबा होता. २६/११ चा हल्ला झाला त्यावेळी बॉम्बनाशक पथकाने या श्वानांसह घटनास्थळी धाव घेतली. अशा वेळी या श्वानांच्या मदतीने संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यास मोलाची मदत झाली. त्याचप्रमाणे कसाबसह त्याचे साथीदार ज्या ठिकाणी घुसले त्यांची ठिकाणे या श्वानांनी शोधून काढली होती. त्यानंतर या श्वानांची वयोमर्यादा संपल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.