मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर राबविलेल्या ऊर्जासंवर्धन मोहिमेच्या माध्यमातून ९.३ दशलक्ष नागरिकांना वीज बचतीचे धडे दिले असून, याद्वारे १४.२ दशलक्ष युनिट विजेची बचत झाली आहे.आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पाण्याइतकाच विजेचे प्रश्नही दिवेंसदिवस गंभीर होत होत असून, देशात कोळशाचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने वीजनिर्मितीला अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून टाटा पॉवरने २००७ साली राष्ट्रीय स्तरावर ऊर्जासंवर्धन मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, लोणावळा, बेळगाव, जमशेदपूर आणि रांची या शहरांतील ४८० शाळांमध्ये राबविली. या अंतर्गत विद्यार्थ्यांना वीज बचतीचे धडे देण्यासह विजेचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोहिमेचा भाग म्हणून ९.३ दशलक्ष नागरिकांमध्ये विजेच्या बचतीबाबत जनजागृती केली. या मोहिमेच्या माध्यमातून ही वीज बचत झाल्याचा दावा टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदना यांनी केला आहे.
ऊजासंवर्धन मोहिमेमुळे विजेची मोठी बचत
By admin | Updated: May 5, 2015 02:00 IST