शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मोठा व्याप; डोक्याला ताप!

By admin | Updated: July 11, 2014 01:20 IST

सक्करदरा, अजनी, कुही आणि हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील काही भागांना एकत्र करून हुडकेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे आणि या ठाण्याला सर्वाधिक क्षेत्रफळ असल्याचा मान मिळाला.

वर्चस्वासाठी गँगवॉर : जमिनीचे वाद, प्रॉपर्टीच्या फसवणुकीचे गुन्हे अधिकमंगेश व्यवहारे - नागपूरसक्करदरा, अजनी, कुही आणि हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील काही भागांना एकत्र करून हुडकेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे आणि या ठाण्याला सर्वाधिक क्षेत्रफळ असल्याचा मान मिळाला. पोलीस ठाण्याच्या भव्य व्याप सांभाळताना, ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताप वाढला आहे. हुडकेश्वरचा पोलीस ठाणे शहराच्या सीमेजवळ आहे. पूर्वी हा भाग शहरातील सक्करदरा व अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यायचा. कालांतराने वस्त्या वाढल्या, लोकसंख्या वाढली, गुन्हेगारी वाढली. त्यामुळे लोकांच्या सोईसाठी २००९ मध्ये पोलीस खात्याने हुडकेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती केली. मात्र यात शहरातील पोलीस ठाण्याबरोबरच ग्रामीण ठाण्यातील काही भागही जोडला. त्यामुळे या पोलीस ठाण्याची व्याप्ती ८६ चौरस किलोमीटर एवढी वाढली आहे. या ठाण्याच्या अर्धेही क्षेत्रफळ कुठल्याच पोलीस ठाण्याचे नाही. गुन्ह्यांचे प्रकार मिहान प्रकल्पामुळे नागपूर शहराचा विकास साधारणत: दक्षिण भागाकडे मोठ्या प्रमाणात होत आहे. हुडकेश्वर पोलीस ठाणेसुद्धा शहराच्या दक्षिण भागात येते. येथे शेतीच्या जमिनीवर ले-आऊट पाडून प्लॉट विक्री जोरात सुरू आहे. नव्या वसाहतीचा विस्तार होत असल्याने, तुरळक घरे येथे आहेत. त्यामुळे घरफोडीचे प्रकार येथे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जमिनीचे वाद, प्रॉपर्टीच्या फसवणुकीचे गुन्हे येथे बऱ्याच प्रमाणात घडत असतात. ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असल्याने, खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या परिसरात फेकण्यात येते. वर्चस्वासाठी गँगवॉरहुडकेश्वर रोडचा दादा कोण यावरून नेहमीच शंकर गजभिये व येल्या मेश्राम या टोळींच्या चकमकी उडतात. येल्याने गजभियेवर देशीकट्ट्यातून गोळ्यासुद्धा झाडल्या होत्या. मात्र गजभिये त्यातून बचावला होता. त्याच्याकडून चार देशीकट्टेही जप्त करण्यात आले होते. क्षुल्लक कारणावरूनही भोसकाभोसकीचे प्रकार ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. दिघोरी बहाद्दुरा परिसरात संजय अवतारे याची टोळी सक्रिय असून, त्याने आकाश पंचभाई या ग्रामपंचायत सदस्याचा खून केला होता. संजय अवतारे सध्या कारागृहात आहे. पुतळे व धार्मिक स्थळे या ठाण्याच्या क्षेत्रात धार्मिक स्थळे आणि पुतळे बऱ्याच प्रमाणात आहे. ठाण्याच्या हद्दीत प्रसिद्ध स्वामी समर्थांचे मंदिर, साईमंदिर अयोध्यानगर, बालाजी मंदिर, अय्यप्पा मंदिर असे पाच मंदिर आहेत. दोन चर्च व चार मस्जिदी आहेत. चार पुतळे आणि १५ शिक्षण संस्था आहेत. गुन्ह्यांचा आलेख या ठाण्यात घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्याने जुगार आणि अवैध दारूचे अड्डे असल्याने बेकायदेशीर दारू विक्रीचे, हाणामाऱ्याचे गुन्हे घडतात. ठाण्याचा गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता, २०११ मध्ये १९६, २०१२ मध्ये ३०४ आणि २०१३ मध्ये ३९४ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत १७२ गुन्हे घडले आहेत. पेट्रोलिंगवर अधिक भरचार महिन्यांपूर्वीपासून ठाण्याचा कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे बघत आहे. ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घरफोडीच्या घटला लक्षात घेता, पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात आला आहे. सध्या ठाण्याच्या हद्दीत दोन चौकी असून, प्रत्येक बीटमध्ये एक चौकी वाढविण्याचा प्रयत्न आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ ८६ चौरस किलोमीटरहुडकेश्वर पोलीस ठाण्याची सीमा ही हिंगणा नाका, बेलतरोडी रोड, आऊटर रिंग रोड, हुडकेश्वर गाव, कुही फाटा, उमरेड रोड, दिघोरी, तुकडोजी चौक, मानेवाडा सिमेंट रोड अशी ८६ किलोमीटरची आहे. अंदाजे लोकसंख्या तीन लाख आहे. पोलीस ठाण्याचे पाच बीट आहेत. विहीरगाव बीटमध्ये प्रगती कॉलनी, नरसाळा, टेलिफोननगर, सर्वश्रीनगर येतात. हुडकेश्वर बीटमध्ये म्हाळगीनगर, हुडकेश्वर परिसर, नीळकंठनगर, नेहरुनगर येतात. अवधूतनगर बीटमध्ये विठ्ठलनगर, संजय गांधीनगर, भोलेबाबानगर, मानेवाडा वस्ती येते. बेसा बीटमध्ये बेसागाव, बेलतरोडी, घोगली व शंकरपूर येते. अयोध्यानगर बीटमध्ये महालक्ष्मीनगर, लाडेकर लेआऊट, उदयनगर, मानेवाड सिमेंट रोडचा पूर्व भाग येतो. मनुष्यबळाचा अभावपोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या ठाण्याला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे. सध्या ठाण्यात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, सात पोलीस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक, २१ महिला पोलीस कर्मचारी, ९९ पोलीस कॉन्स्टेबल असा एकूण १३५ पोलीसांचा स्टाफ आहे. विशेष म्हणजे या ठाण्याच्या पेट्रोलिंग करताना पथकाला जवळपास चार तास लागतात. १५ गावांचा या ठाण्यात समावेश आहे. गावातील रस्ते आणि पेट्रोलिंगचे क्षेत्रामुळे पोलीस ठाण्याची वाहने भंगार झाली आहेत.