शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

देवनारमध्ये पालिका भुखंडावर भूमाफियांचा कब्जा

By admin | Updated: June 4, 2014 22:58 IST

मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाशेजारील मोकळा भूखंड भूमाफीयांनी कब्जात घेतला आहे.

समीर कर्णुक। दि. ०४ (वार्ताहर) मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाशेजारील मोकळा भूखंड भूमाफीयांनी कब्जात घेतला आहे. विशेष म्हणजे हा भूखंड पालिकेच्याच मालकीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनधिकृतपणे रेतीविक्रीचा व्यवसाय होता. सध्या येथे शेट उभारून ट्रक - टँकरचे मोठे गॅरेज सुरू करण्यात आले आहे. मात्र शेजारच्याच इमारतीत बसणारे पालिका अधिकारी याकडे काणाडोळ करत आहेत.२२ हजार चौरस फुटांचा ५२ नंबर प्लॉट देवनार पोलीस ठाण्यापासूनही जवळ आहे. हा भुखंड पालिकेचा असूनही बेवारस अवस्थेत आहे. ना इथे पालिकेची मालकी सांगणारा बोर्ड आहे ना संरक्षक भींत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत सातेक वर्षांपासून अवैधपणे रेती विक्री करणार्‍यांनी तो कब्जात घेतला होता. मात्र काही दिवसांपासून इथली रेती विक्री बंद झाली आणि तिथे टँकर-ट्रक पार्क होऊ लागले. आता तर तिथे शेड उभारून त्याखाली गॅरेज सुरू करण्यात आले आहे. तसेच या शेडमध्ये वीजजोडणीही घेण्यात आली आहे.पालिका कार्यालय, पोलीस ठाणे जवळ असूनही या भूमाफीयांवर कारवाई का होत नाही, असा सवाल इथले स्थानिक रहिवासी करतात. पालिका किंवा अन्य शासकीय यंत्रणांच्या भुखंडांवर सुरूवातीला अशाचप्रकारे अतिक्रमण केले जाते. पुढे वीज, पाणी जोडणी घेतली जाते. लाच देऊन त्या पत्त्यावरील फोटोपास, रेशन कार्ड, आधार कार्ड मिळवून मालकी हक्क प्रस्थापित केला जातो. कालांतराने जेव्हा या भुखंडांवर विकासकाम सुरू होते तेव्हा तेथील अतिक्रमित झोपडपटटया किंवा व्यावसायिकांचे प्रकल्पबाधीत ठरवून अन्यत्र पुनर्वसन करण्याची पाळी शासनावर येते, याकडेही स्थानिक रहिवासी लक्ष वेधतात. दरम्यान, पालिकेच्या एम पुर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना विचारले असता त्यांनी प्लॉट नंबर ५२वरील अतिक्रमणाबाबत आपल्यापर्यंत माहिती आलेली नाही. मात्र माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.