शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून केली आई, पत्नीसह मुलींची हत्या

By admin | Updated: September 10, 2016 13:33 IST

जमिनीच्या वादातून एका इसमाने आपल्या जन्मदात्या आईसह, पत्नी व दोन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीजवळ घडली.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १० -  सांगली : जमीन वादातून एकाने पत्नी, आई व दोन मुलींचा निर्घृण खून केल्याची घटना कुडनूर (ता. जत) येथे शनिवारी पहाटे घडली. आई सुशिला कुंडलिक इरकर (वय ६०), पत्नी सिंधुबाई भारत इरकर (४०), मुली रूपाली भारत इरकर (१९) व राणी भारत इरकर (१६) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर संशयित भारत इरकर (वय ४६) जत पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाची कबूली दिली. भारत इरकर वारकरी संप्रदायातील आहे. त्याच्या वडिलांनी दोन विवाह केले होते. त्याची आई सुशिला त्याच्यासोबत शेतातील घरात रहात होती, तर सावत्र आई सांगलीत राहते. सावत्र आईसोबत त्याचा ३२ एकर शेत जमिनीवरुन वाद आहे. हा वाद मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे, पण भारत खटल्याच्या सुनावणीला हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने पकड वॉरंटही बजावले होते. ही शेतजमीन आपल्या ताब्यातून गेली तर मुला-बाळांनी जगायचे कसे, या विचाराने तो अस्वस्थ होता. यातून त्याने शनिवारी पहाटे साडेपाच वाजता कोयत्याने गाढ झोपेत असलेल्या आई, पत्नी व दोन मुलींवर हल्ला केला. त्याने कोणालाही प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. घरात रक्ताचा पाट वाहत होता. 
 
दोन मुले बचावलीभारतला बाळाप्पा व आकाश ही आणखी दोन मुले आहेत. बाळाप्पा आठवीला, तर आकाश सहावीला आहे. दोघेही शुक्रवारी कुडनूर गावात आत्याच्या घरी अभ्यासाला गेले होते. खूप वेळ झाल्याने ते जेवण करुन तेथेच झोपले. ते घरात असते; तर त्यांचाही खून झाला असता, असे पोलिसांनी सांगितले.