शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

जैतापूर प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: December 23, 2014 23:48 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा केंद्र शासनाचा न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन इंडिया लि. या संस्थेमार्फत राबविला जात आहे

नागपूर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा केंद्र शासनाचा न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन इंडिया लि. या संस्थेमार्फत राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने पुढील निर्णय त्यांनीच घ्यावयाचा आहे. प्रकल्पासंदर्भात राज्य सरकारची भूमिका बदललेली नाही. जैतापूर व आसपासच्या भागातील २००० हेक्टर जमीन अणुऊर्जा प्रकल्पासाठी राखून ठेवण्यात आलेली आहे. संपादित केलेल्या जमिनीतून एकाही कुटुंबाला विस्थापित व्हावे लागलेले नाही. २३३६ पैकी १७२१ प्रकल्पग्रस्तांनी १८५.७९ कोटी इतकी सानुग्रह अनुदानाची रक्कम स्वीकारल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पाला पर्यावरणाचा दाखला देणार का, असा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.संजय दत्त, रामहरी रुपनवर, भाई जगताप आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता. निम्न ज्ञानगंगाच्या भूसंपादनाचा नवीन प्रस्तावबुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील निमकवळा शिवारात ज्ञानगंगा नदीवरील लघु प्रकल्पासाठी उर्वरित जमिनीचे संपादन नवीन प्रस्तावानुसार करणार असल्याची माहिती जलसंपदा व जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.या प्रकल्पाच्या कामाला २०१० मध्ये सुरुवात करण्यात आली असून ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर ३६.७६ कोटींचा खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी २९६.६५ हेक्टर जमीन आवश्यक आहे. पैकी २८४ हेक्टर क्षेत्र खासगी मालकीचे आहे. १२.६५ हेक्टर शासकीय आहे. शेतकऱ्यांनी नवीन कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी केल्याने सरळ खरेदी करण्यात आलेली नाही.सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पास वर्ष २०१४-१५ करिता ५ कोटींची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली.पांडुरंग फुंडकर यांनी लक्षवेधीत हा प्रश्न उपस्थित केला.कामगार क ल्याण मंडळासंदर्भात तातडीने बैठकराज्य कामगार कल्याण मंडळासंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी तातडीने बैठक घेऊ न निर्णय घेणार असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री विजय शिंदे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.कामगार कल्याण वर्गणीच्या दरात दर तीन वर्षानी ३०टक्के वाढ निश्चित करण्याची गरज आहे. परंतु २००० सालापासून ते निश्चित करण्यात आलेले नाही. राज्य सरकारने कामगार कल्याण मंडळाचे ४६.७२ कोटी थकविले आहे. मंडळावर अधिकृत संघटनेच्या प्रतिनिधीची नियुक्ती केली नसल्याचे भाई जगताप यांनी लक्षवेधीतून निदर्शनास आणले.नाशिक जिल्ह्यातील ३७८७ रोहित्रे बदललीनाशिक जिह्यातील नादुरुस्त ३७८७ रोहित्रे बदलण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.या जिल्ह्यात ३२२८ कृ षीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या, यासाठी जिल्ह्यात ४२१ रोहित्रे, २१४ .३५ लघुदाब वाहिनी व ११५.३८ कि.मी. लांबीच्या उच्चदाब वाहिनी टाकण्यात आली आहे. नादुस्त रोहित्र बदलण्यासाठी बिलाची ८०टक्के रक्कम भरण्याची अट शिथिल करण्यात आली होती. त्यात ज्या ग्राहकांनी पैसे भरले त्यांचा वीज पुरवठा सुरू ठेवायचा व पैसे न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु ज्या रोहित्रावरील ७०टक्के पैसे भरलेले आहेत, त्यांना अग्रक्रमाने व त्यानंतर उरलेल्या ग्राहकांचे रोहित्र बदलण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जयंतराव जाधव यांनी ही लक्षवेधी दिली होती. (प्रतिनिधी)