शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लाखाे दिव्यांग बांधव युनिक आयडीपासून वंचित; २.५४ लाख अर्ज अद्याप प्रलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 08:31 IST

दरवर्षी ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून पाळण्यात येताे.

ज्ञानेश्वर भोंडेपुणे : दिव्यांगांना ते दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र  ‘युनिक डिसबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड’ (यूडीआयडी) म्हणजेच युनिक ओळखपत्र दिले जाते. ते मिळवण्यासाठी दिव्यांगांची परवड होत आहे. या प्रमाणपत्रासाठी राज्यात १५ लाख ७३ हजार अर्ज आले असून, त्यापैकी १० लाख ३१ हजार जणांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. अजूनही २ लाख ५४ हजार जणांना मिळालेले नाहीत. २ लाख ८७ हजार अपात्र ठरले आहेत. विलंब होत असल्याने दिव्यांगाना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

छाननीसाठी विलंबदरवर्षी ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून पाळण्यात येताे. फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने २०१२ साली ‘एसएडीएम’ ही संगणकीय प्रणाली विकसित केली. पुढे २०१८ पासून केंद्र सरकारच्या स्वावलंबन प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येऊ लागले. दिव्यांगांना एका कार्डवर सर्व प्रकारच्या शासकीय सोयीसुविधा मिळवण्यासाठी भारत सरकारने ही सुधारित प्रणाली विकसित केली. कायमस्वरूपी तसेच तीव्र स्वरूपात दिव्यंगत्व असणाऱ्यानाही या प्रणालीद्वारे प्रमाणपत्रासाठी पुन्हा तपासणी करावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत.

कार्डसाठी परवड हे कार्ड मिळण्यासाठी दिव्यांगांना प्रचंड परवड हाेते. यामध्ये अर्ज करणे, त्यानंतर त्याच्या तपासणीसाठी येणे हे कष्टप्रद असते. ते मिळाल्यावरही त्यांना विविध याेजनांचा फायदा घेता येत नाही. त्यांना प्रवासात तिकिटाच्या दरात ७५ टक्के सवलत आहे. परंतु, अनेकजण  प्रवास करू शकत नाहीत.

पूर्वीच्या कायद्याने दिव्यांगत्वाचे केवळ सात प्रकार होते. प्रचलित कायद्यानुसार २१ प्रकार आहेत. २०११च्या सात प्रवर्गाच्या लोकसंख्येत नव्याने समावेश झालेल्या प्रवर्गांचा विचार केला, तर अंदाजे तीनपटीने वाढ म्हटले, तर राज्यातील दिव्यांगांची संख्या एक कोटीच्या घरात आहे. यातील फक्त १० लाख दिव्यांगांकडे वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे. उरलेले नागरिक या कार्डापासून वंचित आहेत. -हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, पुणे