शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात चैत्र पोर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 21:30 IST

चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते.

ठळक मुद्दे राज्याच्या विविध प्रांतांतील बहुजन बांधव व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल

 जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीगडावर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त सुमारे १ लाखांहून अधिक भाविकांनी देवदर्शन घेत कुलधर्म-कुलाचार केला. राज्याच्या विविध प्रांतांतून बहुजन बांधवांच्या शिखरी काठ्या गडावर दाखल झाल्या होत्या. रणहलगी, ढोल-ताशाच्या गजरात विविध रंगांच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी-बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते. मात्र राज्यात असलेले दुष्काळाचे सावट, निवडणुकीचा काळ आणि तीव्र उन्हाळा यामुळे यावर्षी यात्रेला भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत होते.चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते. राज्याच्या विविध प्रांतांतील बहुजन बांधव व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल होत यळकोट... यळकोट असा गजर करीत भंडाऱ्याची उधळण करीत कुलधर्म-कुलाचार करतात. सालाबादप्रमाणे यावषीर्ही उत्सव साजरा करण्यात आला. श्री मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनाकडून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मल्हारगडावर सावलीचे आच्छादन करण्यात आले होते. गडकोट आवारात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. खंडेरायाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठार मंदिरामध्ये चैत्र षड्रात्रीनिमित्त स्वयंभू लिंगावर दवण्याची पूजा करण्यात आली. पौर्णिमेचे औचित्य साधून नित्यनेमाची पूजा करताना सुगंधी दवणा वनस्पतीने स्वयंभू लिंग आच्छादण्यात आले. यावेळी मनोज बारभाई, सचिन सातभाई, नीलेश बारभाई, कडेपठार देवस्थान सचिव सदानंद बारभाई आदी उपस्थित होते.सुगंधी दवणा वनस्पतीचे महत्त्व कुलदैवत खंडेरायाच्या कुलधर्म-कुलाचार धार्मिक विधींमध्ये दवणा या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. दररोजच्या त्रिकाल पूजेमध्ये या सुगंधी वनस्पतींचा वापर केला जातो. तसेच दवणा अत्यंत सुगंधी, अतिशय थंड व गुणकारी समजली जाते.  विंचवाच्या दंशावर या वनस्पतीची मुळी उगाळून लावली जाते. विशेष म्हणजे जेजुरी परिसरातच दवणा वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते. या वनस्पतीपासून अत्तरे, अगरबत्ती तयार केली जाते मात्र डिसेंबर ते मार्च या कालावधीत या वनस्पतीचे  उत्पादन घेण्यात येत असल्याने देवांच्या जत्रा-यात्रा उत्सवकाळात ती  हिरवी असते. इतर काळात ती वाळवलेली भाविकांना उपलब्ध होते. 

टॅग्स :JejuriजेजुरीJai Malharजय मल्हार