शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:03 IST

Ladki Bahin Yojana: माझ्या खात्याकडे ३ हजार कोटींचे दायित्व आहे. अशा वेळी खाते चालवणे मुश्कील होईल. - शिरसाट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणे शक्य नसल्याची प्रांजळ कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना  दिली.

वित्त विभागाने गेल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय, तसेच  आदिवासी विकास विभागाचा अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग केला. त्यावरून शिरसाट यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविण्यास ठाम विरोध करत ते म्हणाले, फेब्रुवारीत जेव्हा लाडक्या बहिणींसाठी  निधी कपात करण्याबाबतची फाइल माझ्याकडे आली होती, तेव्हा आपण निधी कपात करू नये, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. माझ्या खात्याकडे ३ हजार कोटींचे दायित्व आहे. अशा वेळी खाते चालवणे मुश्कील होईल.

पैसे आभाळातून आणणार का?कोल्हापूर : लाडकी बहीण ही लोकप्रिय योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला पैसे देताना अर्थ विभागाची ओढाताण होते. त्याचा कमी-अधिक परिणाम सर्वच विभागांवर झाला आहे, हे संजय शिरसाट यांनी समजून घेतले पाहिजे.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाSanjay Shirsatसंजय शिरसाट