शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव

By admin | Updated: August 6, 2016 02:46 IST

अतिवृष्टीमुळे जनावरांमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनावर उपचारांसाठी पाली गाठावे लागत आहे

पाली : अतिवृष्टीमुळे जनावरांमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनावर उपचारांसाठी पाली गाठावे लागत आहे. सुधागड तालुक्यात जशी प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था आहे तशीच किंवा किंबहुना वाईट अवस्था येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांची आहे. सुधागड तालुक्यात एकूण ६ दवाखाने असून प्रथम श्रेणी दवाखाने पाली, जांभुळपाडा आणि चव्हाणवाडी येथे तर द्वितीय श्रेणी दवाखाने खवली, नांदगाव आणि वाघोशी येथे आहेत. परंतु या सर्व दवाखाने मिळून फक्त दोन ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असल्याने अन्य चार ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपल्या जनवारांच्या उपचारासाठी फार त्रेधातिरपीट करावी लागत आहे. शेतकरी आपल्या पशुधनाला घरातल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असतो. एखादा जरी पशू आजारी पडले तरी घरातील लहान मोठ्यांपासून सर्वांचीच तळमळ होते. शासन एकीकडे शेतकरी जगला पाहिजे म्हणून प्रयत्नशील असताना शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाकडे पाहिले जाते परंतु सुधागड तालुक्यात मात्र असे होताना दिसत नाही. मागच्याच आठवड्यात घेरा सुधागड येथे थंडीने गारठून १६ जनावरे दगावल्याची घटना ताजी असताना प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतल्याची पहायला मिळाली नाही. पालीचे उपसरपंच सचिन जवके आपल्या दुभत्या जनावरांच्या उपचारासाठी पाली येथे आले तेव्हा पाली दवाखान्यात कोणीच उपस्थित नव्हते. याबाबत पाली येथील गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांना कोणतेच प्रश्नावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांनी कोठे जायचे हा प्रश्न आहे. पशू विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यानिमित्ताने दुर्लक्षित राहत असल्याचे समोर येत आहे.>शासनाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या न केल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी या जागा रिक्त असून आपल्या तालुक्याचा तळा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे चार्ज दिलेला असून त्यांच्याकडून सुधागडसाठी वार नेमून घेतले जातील. - संजय भोये, गटविकास अधिकारी, सुधागड