शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मंडप धोरणात शिथिलता

By admin | Updated: August 26, 2016 00:43 IST

विविध निकषांचा समावेश असलेले धोरण महापालिकेच्या वतीने मागील वर्षी तयार करून उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आले

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवात रस्त्यावर मंडप उभारताना रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी विविध निकषांचा समावेश असलेले धोरण महापालिकेच्या वतीने मागील वर्षी तयार करून उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आले आहे. मात्र, अनेक गणेश मंडळांकडून या धोरणाचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे चित्र शहरामध्ये दिसून येत आहे. उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांकरिता मंडप धोरण तयार करण्याचे निर्देश मागील वर्षी सर्व महापालिकांना दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने रस्त्यात मंडप टाकण्याबाबतची नियमावली तयार करून त्याला मुख्य सभेची मान्यता घेतली. त्यानंतर ही नियमावली उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे. विविध उत्सवांकरिता मंडप उभारताना संपूर्ण रस्ता अडविला जाऊ नये. रस्त्यामध्ये खड्डे पडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. अधिक रहदारी असलेल्या हॉस्पिटल, कॉलेज, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात मंडपांना परवानगी देऊ नये असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्याचबरोबर विनापरवाना लाऊडस्पीकर लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात यावी. याबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून त्याची नोंद ठेवण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले होते. मंडप धोरणानुसार त्यांना रस्ता बंद करता येणार नाही. मंडप धोरण केवळ गणेशोत्साबरोबरच नवरात्रोत्सव, सभा, मीटिंग, बैठका या सर्वाकरिता टाकल्या जाणाऱ्या मंडपांसाठी लागू आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार केलेल्या मंडप धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालिका व पोलीस यंत्रणा यांच्यावर सोपवली आहे. मंडप धोरणाला अंतिम स्वरूप दिल्यानंतर गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन त्यांना माहिती दिली होती. त्याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप यांनी बैठका घेतल्या आहेत. >३०० पेक्षा जास्त मंडळांनी घेतली परवानगीशहरातील ३०० पेक्षा जास्त गणेश मंडळांनी १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परवानगी घेतली आहे. त्याचबरोबर शेकडो मंडळांनी अर्ज केले असून, त्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांनी दिली.