- श्यामकुमार पुरे
सिल्लोड, दि. 20 - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत अपातकालीन सुविधाचा अभाव कायमच असून परिसरात जपान सरकारच्या मदतीने विकसाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत असतांना प्रथमउपचार,रुग्णवाहीका, अग्निशामक बंब, दुरसंचार सेवा सारख्या आपात कालीन सुविधा जगप्रसिद्ध ठिकाणी अदयापही पोहचल्या नाहित. यामुळे लेणीत कुंडात पडून मरण पावलेल्या यूवकाच्या प्रेताची अवहेलना झाली.शुक्रवारी सेल्फी काढण्याच्या नादांत तरुणाचा लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या सप्तकृडांत पडून पाण्यात बुडून मुत्यू झाला होता. घटनेमुळे पुन्हा ऐकदा जगप्रसिद्ध 'अजिंठा लेणीत' 'आपातकालीन' असुविधेचे दर्शन घडले .मृतदेहाचा खडतर प्रवास... शुक्रवारी कुंडात पडलेल्या जालना जिल्हातील तरूणाचा मृतदेह शनिवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढूण बस प्रतिक्षालयापर्यंत माणसांनी उचलून आणले.नंतर एसटीच्या बसने अजिंठा टि पाईट पर्यत आणून दुसर्या वाहनाने नेण्यात आले. या पूर्वी येथे अनेकदा अशा दुर्घटना घडल्या आहेत मात्र असुविधा कायमच आहे.
साधा प्रथम उपचार सुध्दा नाही...जगप्रसिद्ध ठिकाणी भेट देण्यासाठी येथे दररोज शेकडो देशी विदेशी पर्यटक येतात. डोंगरदरीत आलेल्या पर्यटकांना येथे साधी प्रथम उपचार सुविधा सुध्दा उपलब्ध नाही.तसेच लेण्यांमध्ये कुढलीही मोबाईल रेंज नसल्याने दुरून आलेल्या पर्यटकांना नातलगासह इतरांशी संर्पक साधन्यास पर्यायी व्यवस्था नाही. आपात्कालीनप्रसंगी मोठी फजिती होते.अग्निशमन बंम नाही.. ट्रॉमा सुध्दा रखडले..अजिंठा परिसरात डोगंरदरित अनेकदा वणवा पेटण्याच्या घटना सतत घडतात.विशेष म्हणंजे लेणी परिसरातील जंगलाला आग लागल्यास वाहन प्रवेशबंदी मुळे वन विभागाच्या कर्मचार्यानां आग विझविण्यासाठी मोठी फजिती होते.तसेच अग्निशामक बंब अभावी महामार्गवर सुध्दा आगीमुळे अनेक वाहनांची राखोळी तर झालीच शिवाय अनेकांचा बळी सुध्दा गेल्याचा घटना घडल्या आहेत.तर अजिंठागावात मंजूर ट्रॉमाचे बांधकामच सा.बा.विभागाच्या ठेकेदाराच्या प्रेमापोटी अनेक वर्षापासून रखडल्याने महामार्गवरील अपघातग्रस्त पर्यटकांना तातडीचे उपचार सुध्दा मिळत नसल्याने अनेकाचा उपचाराअभावी बळी सुध्दा जात आहे. दोन गावाना सुध्दा फटका.. तब्बल ३०,४० किमीचा फेरा..अजिंठा टि पाईटं ते लेण्या प्रर्यतच्या ४ कि. मी अंतरावर एसटीच्या प्रदुषण विरहीत बसेस वगळता इतर वाहनाना प्रवेश बंदी आहे.याच मार्गावरून लेण्यांच्या माथ्यावरच असलेले सावरखेडा,लेणांपूर या गावांना याच बसने जावे-यावे लागते.रात्रीच्या सुमारास या बसेस बंद असल्याने या दोन्ही गांवाना आपातकालीन प्रंसगी खाजगी वाहनाने हलदा , सोयगाव मार्गे तब्बल ३० ते ४० कि.मी.चा फेरा मारावा लागतो.शिवाय या स्थानीक लोकांना या बस मधे सवलत नाही.4 की मी चे भाड़े 20 रुपयेपर्यटन विभाग येथे येणाऱ्या पर्यटकांची लूट करत आहे. फर्दापुर टी पॉइंट ते लेणी केवळ 4 की. मी.अंतर आहे. प्रदूषण मुक्त बसच्या नावाखाली 20 रुपये भाड़े वसूल केल्या जाते. ही एक प्रकारची लूट असल्याचे पर्यटक बोलतात.