शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गड्या, आपला गाव बरा! कोरोनाच्या भीतीमुळे मजुरांचे स्थलांतर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:16 IST

मुंबई ते फैजाबाद, कारैक्काल दरम्यान विशेष रेल्वे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, छाेट्या - छाेट्या कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, राेजंदारीवरील कामगार लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. गड्या आपला गाव बरा या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून मजुरांचे स्थलांतर सुरू आहे.मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या चालविण्यात येतात. त्यामध्ये सर्वाधिक गाड्या या उत्तरप्रदेश, बिहार, पटनाकरिता धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. एलटीटी - गाेरखपूर, एलटीटी - वाराणसी, एलटीटी - पटना, एलटीटी - दरभंगा या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस- फैजाबाद द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी १४ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार आणि शनिवारी ०६.०० वाजता सुटेल आणि फैजाबादला दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.५५ वाजता पोहोचेल.   फैजाबाद येथून विशेषगाडी १५ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १६.०५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस- कारैक्काल साप्ताहिक विशेष गाडी १७ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी १३.१५ वाजता सुटेल आणि कारैक्काल ‍येथे दुसऱ्या दिवशी १८.५० वाजता पोहोचेल. कारैक्काल येथून विशेष गाडी १९ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवारी १४.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ‍येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल.  एलटीटी - पटना, एलटीटी - दरभंगा या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.सायन येथे पाणीपुरीचा व्यवसाय करत होतो पण कोरोना वाढल्याने गेल्या आठ दिवसात ग्राहकांमध्ये घट झाली आहे. काहीच धंदा होत नाही त्यामुळे उत्तरप्रदेश येथील मुळगावी परत चाललो आहे. कोरोना संपल्यावर परत येईल.- सलीम शेख, पाणीपुरी विक्रेता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या