शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

चोरी करुन हाती लागले काय तर कॉन्डम, तूप आणि साबण

By admin | Updated: October 19, 2016 11:35 IST

मोठा दरोडा मारण्याच्या उद्देशाने एका इमारतीत घुसलेल्या दोन चोरांना फक्त कॉन्डम, तूप आणि साबणावर समाधान मानवे लागले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 - मोठा दरोडा मारण्याच्या उद्देशाने एका इमारतीत घुसलेल्या दोन चोरांना फक्त कॉन्डम, तूप आणि साबणावर समाधान मानावे लागले आहे. मोठी रोकड हाती लागावी, यासाठी दोघांनी तब्बल तीन वेळा चोरीचा प्रयत्न केला, पण हाती लागले काय तर कॉन्डम, तूप, साबण आणि केवळ 8 हजार रुपये. नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळील पार्श्वनाथ इमारतीमधील ही घटना आहे. त्यांच्या या अपयशी चोरीच्या लीला सीसीटीव्हीमध्ये कैद होत आहेत, याचीदेखील त्यांना कल्पनादेखील नव्हती. 

 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या चोरांनी तळमजल्यावरील एका मेडिकल स्टोअरचे शटर तोडून त्यात घुसखोरी केली. येथे त्यांच्या हाती केवळ 5 हजार रुपयेच लागले. यानंतर त्यांनी येथील कॉन्डमची पाकिटे, कॉम्प्यूटरचा सीपीयू आणि मोबाईल फोनवर डल्ला मारला.  ही चोरी करताना यातील एकजण जखमी झाल्याने त्याच्या रक्ताचे थेंब स्टोरमध्ये पडले होते. यावरुन चोरी झाल्याची बाब उघड झाली. चोरी झालेल्या सीपीयूमध्ये महत्त्वपूर्ण डाटा असल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. 
 
पहिल्या प्रयत्नात महागड्या वस्तू हाती न लागल्याने दोघांनी आपला मोर्चा दुस-या मेडिकल स्टोरमध्ये वळवला. येथेही त्यांच्या हाती मोठं घबाड लागलेच नाही. येथे फक्त त्यांना  3 हजार रुपये आणि पंतजलीचे तूप, चॉकलेट आणि साबणावरच समाधान मानावे लागले. तिसरी चोरी करण्यासाठी हे दोघे एका कोचिंग सेंटरमध्ये घुसले. तिथेही पदरी निराशाच पडली, कारण येथे त्यांना केवळ एक स्वस्तातील मोबाईलच सापडला.
 
चोरीसाठी एवढी मेहनत करुनही दोघांच्या हाती फक्त कॉन्डम, तूप, साबण आणि 8 हजार रुपयेच लागले आहेत.  चोरांचे दुर्दैव आणि स्टोअर मालकांचे सुदैव म्हणावे लागेल. मात्र, सीसीटीव्हीमध्ये जरी दोनच चोर दिसत असले, तरी बाहेर आणखी काही चोर यांची वाट पाहत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.