शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

"कुणाल कामराला माफी मागण्याची गरज नाही, आमचं त्याला समर्थन’’, ठाकरे गटाने घेतली स्पष्ट भूमिका

By बाळकृष्ण परब | Updated: March 25, 2025 10:45 IST

Shiv Sena UBT Support Kunal Kamra: एकीकडे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कुणाल कामराचं समर्थन करण्यात आलं असून, त्याने माफी मागण्याची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यानी केलं आहे.

कॉमेडीयन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या विडंबन गीतामुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. या कामराने केलेल्या विडंबनानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या शोचं चित्रिकरण होत असलेल्या सेटची मोडतोड केली. तसेच कुणाल कामराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल करण्यात आले आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कुणाल कामराचं समर्थन करण्यात आलं असून, त्याने माफी मागण्याची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यानी केलं आहे.

कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचं समर्थन करताना अंबादास दानवे म्हणाले की, कुणाल कामरा यांची भूमिका चुकीची नाही. आम्ही तिचं समर्थन केलंय. तसेच आता पुन्हा एकदा त्याचं समर्थन करतो. त्यांनी माफी मागण्याची गरज नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. तसेच त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. ठाण्यात रिक्षा एकच आहे का? ठाण्यात दाढीवाला एकच आहे का? ठाण्यात चष्मा एकच आहे का? अनेक लोकं आहेत. कुणीही असू शकतं, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही कुणाल कामरा याचं समर्थन केलं आहे. "कुणाल कामराने काहीही चुकीचं केलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं हा देशद्रोह असतो का? आपण औरंगजेबाला तसंच म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना. या लोकांनी नवीन शब्दकोश तयार केला असेल तर तसं सांगावं, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Kunal Kamraकुणाल कामराAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे