शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गृहराज्यमंत्र्यांसमोर कोथळे कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:40 IST

अनिकेतच्या खून प्रकरणात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन केले जाईल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला. पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केसरकर रविवारी सांगलीत दाखल झाले.

ठळक मुद्देतपास सीबीआयकडे सोपविण्याच्या मागण्यांबाबत अनिकेतचे कुटुंबीय आग्रही गृहराज्यमंत्र्यांसमोर व्यक्त केला संतापआम्हाला संरक्षण द्या : भंडारेच्या आईची मागणीतपास सीबीआयकडे देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय : केसरकर

सांगली : अनिकेतच्या खून प्रकरणात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन केले जाईल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला.पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केसरकर रविवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले. त्यांनी या कुटुंबाच्या घरी भेट दिली. यादरम्यान नातेवाईकांनी पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचा तपास करणारी सीआयडीची यंत्रणा ही पोलिस दलातीलच आहे. त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही. यासाठी हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा. अजूनही पोलिसांनी आमची फिर्याद नोंदवून घेतलेली नाही.

आमच्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करु, असा इशारा त्यांनी दिला. यावर केसरकर यांनी, याचा तपास सीबीआयकडे देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, तुम्हाला शासनाकडून मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, शेखर माने, आनंदराव पवार, संजय विभुते, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक रवींद्र शेळके यावेळी उपस्थित होते. यावेळी अनिकेतच्या घरासमोर प्रचंड गर्दी झाली होती.

आम्हाला संरक्षण द्या : भंडारेच्या आईची मागणीकवलापूरच्या अभियंत्यास लुबाडल्याप्रकरणी अनिकेतसोबत अमोल भंडारे यालाही अटक केली होती. भंडारेसमोरच अनिकेतचा खून झाला आहे. भंडारे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आज ना उद्या तो जामिनावर बाहेर येईल. माझ्या मुलास तसेच मला व माझ्या दिरास अटकेत असलेल्या कामटेसह अन्य आरोपींच्या नातेवाईकांकडून धोका असून, आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी भंडारेची आई रेखा यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. माझ्या मुलास आता कोणी नोकरी देणार नाही. त्यामुळे त्याला सरकारी नोकरी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Sangliसांगली