शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणे टपाल कार्यालयाचा कोंडवाडा

By admin | Updated: July 20, 2016 02:24 IST

खासदारांच्या पाहणी दौऱ्यानंतर कोपरखैरणेतील पोस्ट कार्यालय कँटीनच्या जागेत हलवण्यात आले आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- खासदारांच्या पाहणी दौऱ्यानंतर कोपरखैरणेतील पोस्ट कार्यालय कँटीनच्या जागेत हलवण्यात आले आहे. यामुळे पोस्टाचे दैनंदिन कामकाज भर पावसात उघड्यावर पडले आहे, तर पुरेशा जागेअभावी नागरिकांचे महत्त्वाचे दस्तऐवज असुरक्षितरीत्या पडून आहेत.आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचा अनुभव सध्या कोपरखैरणे पोस्टाचे कर्मचारी अनुभवत आहेत. जुलै महिन्याच्या सुरवातीला कोपरखैरणे सेक्टर ७ येथील पोस्ट कार्यालयात छताचे प्लास्टर कोसळले होते. वृत्तपत्रांद्वारे याची माहिती मिळताच खासदार राजन विचारे यांनी सदर पोस्ट कार्यालयाला भेट देवुन पाहणी केली होती. यावेळी सिडको व पोस्टाचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. पोस्टाचे कर्मचारी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काम करत असल्याचे नजरेस पडताच विचारे यांनी त्याठिकाणी डागडुजी करण्याचे सिडकोला निर्देश दिले. तसेच डागडुजीच्या कामाला तत्काळ सुरवात करण्याकरिता पोस्टाला पर्यायी जागा देण्याचेही त्यांनी सुचवले. परंतु सिडको पोस्टाची पर्यायी सोय करत असून ती जागा कार्यालयासाठी योग्य नसल्याचे पोस्ट कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांचे म्हणणे न ऐकताच सिडकोच्या सोयीनुसार निर्देश देवून खासदार मोकळे झाले होते. सिडकोनेही संधी साधत अवघ्या तीनच दिवसात पोस्टाचे कार्यालय एनएमएमटी डेपोच्या कँटीनमध्ये हलवले आहे. खासदारांच्या या घाईमुळे पोस्टाचे संपूर्ण कामकाज उघड्यावर पडले आहे. पोस्टमन व अधिकारी अशा सुमारे २० कर्मचाऱ्यांसाठी छोट्याशा कँटीनची जागा अपुरी पडत आहे, तर रोजचे टपाल ठेवायला देखील त्याठिकाणी जागा नाही. वाटप करण्यापूर्वी पत्रांची अथवा बिलांची मांडणी करण्यासाठी देखील जागा नसल्यामुळे उघड्यावर बसून पोस्टमन कामे करत आहेत. जेमतेम पाच ते सहा टेबल असल्यामुळे एकाचे काम झाले की दुसऱ्याला त्याठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ जात असून त्यांच्या पुढील कामकाजावर परिणाम होत आहे. या प्रकारात नागरिकांपर्यंत टपाल पोचण्यासही विलंब होत आहे. या त्रासात पुरुषांसह महिला कर्मचारी देखील भरडल्या जात आहेत.